बहुरूपी समाजावर उपासमारीची वेळ

By Admin | Updated: July 15, 2014 00:55 IST2014-07-14T23:29:53+5:302014-07-15T00:55:47+5:30

शेवगा : जिल्ह्यात सध्या बहुरूपी समाजातील अनेक मंडळी घरोघरी जाऊन विविध सोंग करून, विशिष्ट लयीत बात बोलून नागरिकांची करमणूक करत आहे.

Time for starvation on polynomial communities | बहुरूपी समाजावर उपासमारीची वेळ

बहुरूपी समाजावर उपासमारीची वेळ

शेवगा : जिल्ह्यात सध्या बहुरूपी समाजातील अनेक मंडळी घरोघरी जाऊन विविध सोंग करून, विशिष्ट लयीत बात बोलून नागरिकांची करमणूक करत आहे.
ग्रामीण भागात देखील आपली कला सादर करत, कसा बसा आपला उदरनिर्वाह करत आहे. उदरनिर्वाह करत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.शहरात अनेक असे सोंग करून आपल्या कला दाखवीत पोट भरत आहे. शहरासह काही जणांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे. बहुरूप धारण करून नागरिकांची करमणूक करणे हा व्यवसाय आमचा पिढ्यान् पिढ्या चालत आल्याचे विजय सावंत, अनिल सावंत यांनी सांगितले.
वयाच्या सोळाव्या वर्षांपासून बहूरूपी म्हणून गेली अनेक वर्ष नागरिकांची करमणूक करत आहे. समाजात गरिबी, अशिक्षितपणा आणि सततच्या भटकंतीने आमच्या मुलाबाळाचा शिक्षणाचा प्रश्न, शासनाच्या काही योजना आम्हाला माहीत पडत नाही. अशिक्षित असल्याने काही कळतही नाही फक्त पोट भरण्यासाठी काहीतरी करावे त्यासाठी आम्ही आमचा पारंपरिक व्यवसायाप्रमाणे सतत भटकत असलेले विजय सावंत यांनी आपल्या पोलिसांची वेशभूषा करून अनेक कला सादर करून आमच्या कुंटुबाचा गाडा रेटत आहेत. वडिलांपासून हा वारसा मी चालवत आहे.
बहरूपी समाजाची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून ओळख आहेत.त्याकाळत अनेकजण दरबारात मनोरंजनाचे काम, वेषांतर करून खबऱ्या म्हणूनही काम करत होते. जसजसा काळ बदलत गेला तसा आमच्या कला गुणांचा हास होत चालला आहे.
नवीन मूल हा व्यवसाय स्वीकारत नसल्याने ही परंपरा ऱ्हास होण्याच्या मार्गावर आहे. आणि आमच्या समाजावर उपासमारीची वेळ आल्याचे सावंत यांनी सांगितले.
बदलत्या काळात समाजासमोर शिक्षण आरोग्य हे महत्वाचे प्रश्न समोर आहे. पोट भरण्यासाठी गावोगावी फिरावे लागत असल्याने मुलाबाळांचे शिक्षण होत नाही.शिक्षण घेण्यासाठी आमच्याकडे पुरेसा पैसा देखील नाही पोट भरावे की शिक्षण घ्यावे असा गंभीर प्रश्न समाजासमोर आहे. सतत भटकंती करावी लागत असल्याने शासकीय योजनेची देखील व्यवस्थीत माहिती मिळत नाही. इंटरनेट, टी व्ही. मोबाईलमुळे आमची कलेकडे नागरिंकांचे दुर्लक्ष होत आहे. याचा मोठा परिणाम झाला आमच्या कलेवर झाला आहे. दान मिळने कठीण झाले आहे.
आजही ग्रामीण भागात बाबासाहेब चौघुले, अनिल सावंत हे डॉक्टर, पोलिस, वकील यांचे सोंग करून कला सादर करत आहे.आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करत आहे.
शिवाजी महाराजांच्या काळापासून बहुरुपी
बहरूपी समाजाची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून ओळख आहेत.त्याकाळत अनेकजन दरबारात मनोरंजनाचे काम, वेषांतर करून खबऱ्या म्हणूनही काम करत होते. जसजसा काळ बदलत गेला तसा आमच्या कला गुणांचा हास होत चालला आहे. बहुरुपींना मानधन देण्याची मागणी होत आहे. शासनदरबारीही अवहेलनाच पदरी पडत आहे.

Web Title: Time for starvation on polynomial communities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.