शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीपूर्वीच पिकविम्याची मुदत संपली

By admin | Updated: July 1, 2014 00:38 IST

रामेश्वर काकडे, नांदेड खरीप हंगामातील विविध पिकांसाठी शासनाने यावर्षापासून हवामान आधारित पीकविमा योजना लागू केली. परंतु पिकांच्या पेरणीपूर्वीच विम्याची मुदत संपल्यामुळे हजारो शेतकरी वंचीत राहिले

रामेश्वर काकडे, नांदेडखरीप हंगामातील विविध पिकांसाठी शासनाने यावर्षापासून हवामान आधारित पीकविमा योजना लागू केली. परंतु पिकांच्या पेरणीपूर्वीच विम्याची मुदत संपल्यामुळे हजारो शेतकरी पिक विम्यापासून वंचीत राहिले आहेत.शासनाने नांदेड जिल्ह्यातील सर्व गावांचा हवामान आधारित पीकविमा योजनेत समावेश केलेला आहे. खरीप हंगाम २०१४-१५ मध्ये सोयाबीन, कापूस, मूग व उडीद या चार पिकांसाठी विमा योजना लागू केली. शेतकऱ्यांना खरीप पिकांचा विमा भरण्यासाठी ३० जून २०१४ ही शेवटची मुदत दिली होती. परंतु आजघडीला जिल्ह्यात खरीपाच्या केवळ ३ ते ४ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी आपण पेरणी केलीच नाही, तर विमा काढायचा कशाचा हा विचार करुन विमा काढण्याकडे पाठ फिरवली आहे. तर कंपनीने विमा भरण्यासाठी कमी दिवसाचा कालावधी दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेवटची तारीखच कळू शकली नाही. परिणामी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी पिकांना संरक्षितता देण्यापासून दूर राहिले आहेत.संभाव्य पेरणीच्या आधारे विमा भरण्याची मूभा विमा कंपनीने दिली होती. पीक पेरल्यापासून पीक तयार होण्याच्या कालावधीत अपुरा पाऊस, पावसात खंड, अतिवृष्टीपासून नुकसान झाल्यास विमा संरक्षण मिळणार आहे. परंतु जिल्ह्यात अद्याप पीकांची पेरणीच झाली नसल्याने पिकविम्यापाचा जवळपास ७५ ते ८० टक्के शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. सदर योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी सक्तीची तर बिगर कर्जदार शेतकऱ्यासाठी एैच्छिक स्वरुपाची आहे. प्रति हेक्टरी शेतकऱ्यांनी स्वत:च्या हिश्याचे कापसासाठी ९५० रुपये, सोयाबीन ९२३ रुपये, उडिदासाठी ७५६ तर मुगासाठी ६१२ रुपये भरावयाचे आहेत.बँकांनी शेतकऱ्यांना पेरणी प्रमाणपत्रासाठी आडवणूक करु नये, असे अ‍ॅग्रीकल्चर इन्शूरन्स कंपनीने सर्व बँकांना पत्र पाठवून सूचित केले होते. शेतकऱ्यांनी अर्जासोबत सातबारा जोडून विमा हप्ता भरावयाचा होता.सेतू सुविधा केंद्र झाले हँग-पिकविमा भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३० जून रोजी जिल्ह्यातील बहुतांश सुविधा केंद्र हँग झाले होते, यामुळे सातबारा काढण्यासाठी शेतकऱ्यांना तास्नतास सेतू केंद्रावर ताटकळत बसावे लागले. याचा परिणाम अनेक शेतकऱ्यांना सातबाराच मिळू शकल्या नाहीत, नवीन वर्षातीलच सातबारा सोबत जोडावा असा, अलिखित नियम बँकांनी काढल्याने याचा परिणाम हजारो शेतकऱ्यांना पिकविमा काढता आलेला नाही. जिल्ह्यात ठिकठिकाणच्या सेतू केंद्रावर सातबारा काढण्यासाठी गर्दी झाली होती, यामुळे सर्वच ठिकाणी सर्व्हरवर लोड आल्यामुळे सेतुची सुविधाही ठप्प झाली होती. यामुळे शासनाने पिकविमा काढण्याची तारीख वाढवून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे़(प्रतिनिधी) आजपर्यंत जिल्ह्यात पेरण्यांलाच सुरुवात झाली नसल्याने शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहिले आहेत. रामराव कदम, जिल्हाध्यक्ष, कृषी व ग्रामीण विकास विभाग, काँग्रेस.विम्यासाठी कमी कालावधी होता़ यामुळे शासनाने तारीख वाढवून दिल्यास सर्व शेतकऱ्यांना विमा काढता येईल. प्रल्हाद इंगोले, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना