वेरुळात भाविकांनी केली अलोट गर्दी
By Admin | Updated: August 11, 2014 00:32 IST2014-08-11T00:31:34+5:302014-08-11T00:32:25+5:30
वेरूळ : श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारच्या निमित्ताने हजारो शिवभक्तांचा जनसागर वेरुळात मोठ्या उत्साहात दाखल झाला आहे.

वेरुळात भाविकांनी केली अलोट गर्दी
वेरूळ : श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारच्या निमित्ताने हजारो शिवभक्तांचा जनसागर वेरुळात मोठ्या उत्साहात दाखल झाला आहे.
श्री घृष्णेश्वराच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होत असल्याने निसर्गाचा कोप, दुष्काळी परिस्थिती दूर व्हावी म्हणून दरवर्षीप्रमाणे तीर्थकुंडात स्नान करून सोवळ्यात पाणी घेऊन जातेगाव येथील मोठ्या महादेवाला जाण्याची परंपरा कायम ठेवत हजारो भाविकांनी ‘बम बम भोले’, ‘हर हर महादेव’ची गर्जना करीत अनवाणी पायी चालत गर्दी केली होती.
यंदा पर्जन्यमान अत्यल्प झाल्याने तीर्थकुंडातील पाण्याची पातळी खोल गेली. तीर्थकुंड खोल असल्याने अनेक भाविकांना यापूर्वी जीव गमवावा लागला; परंतु यावेळेस वेरूळच्या ब्रह्मवृंद कमिटीने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी नेट (जाळी) लावल्याने भाविकांना सुरक्षित स्नान करता आले.
पायी जाणाऱ्या भाविकांना वाहनांचा त्रास होऊ नये म्हणून वाहतूक पूर्णपणे वळविण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांत सुरक्षेची भावना निर्माण झाली होती. रविवारी यात्रेचे स्वरूप आली होते.