तान्ह्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी आईला उद्यापर्यंत कोठडी
By Admin | Updated: May 21, 2014 01:13 IST2014-05-21T01:01:58+5:302014-05-21T01:13:06+5:30
वाळूज महानगर : शिवराईत एक महिन्याच्या मुलीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या तिच्या आईला न्यायालयाने २२ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली.

तान्ह्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी आईला उद्यापर्यंत कोठडी
वाळूज महानगर : शिवराईत एक महिन्याच्या मुलीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या तिच्या आईला न्यायालयाने २२ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली. शिवराई येथे सात महिन्यांपूर्वी एका महिन्याच्या मुलीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला होता. या संशयास्पद मृत्यूप्रकरणी वाळूज पोलिसांनी मुलीची आई चंदाबाई कर्डिले हिला १९ मे रोजी अटक केली होती. मंगळवारी तिला न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपास पोलीस निरीक्षक अशोक कदम करीत आहेत.