शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा उद्या निकाल, रिझल्ट कुठे व कसा पाहायचा? A टू Z माहिती
6
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
7
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
8
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
9
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
10
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
11
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
12
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
13
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
14
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
15
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
16
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
17
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
18
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
19
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
20
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाई शहरात घड्याळाचीच टिकटिक

By admin | Updated: October 22, 2014 01:19 IST

राजेश खराडे ल, बीड केज विधानसभा मतदार संघात भाजपाच्या उमेदवार संगीता ठोंबरे विजयी झाल्या आहेत. मात्र अंबाजोगाई शहर मतदारांनी रा.कॉ. च्या नमिता मुंदडा यांना कौल दिला आहे.

राजेश खराडे ल, बीडकेज विधानसभा मतदार संघात भाजपाच्या उमेदवार संगीता ठोंबरे विजयी झाल्या आहेत. मात्र अंबाजोगाई शहर मतदारांनी रा.कॉ. च्या नमिता मुंदडा यांना कौल दिला आहे. जिल्ह्याच्या निवडणुकीत यंदा अमुलाग्र बदल झाला असून गतवेळी रा.कॉ पाच तर भाजपाला केवळ एक जागा मिळवण्यात यश आले होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत हेच चित्र उलटार्थी झाले असून भाजपाला जिल्ह्यात पाच ठिकाणी तर रा.कॉ. ला केवळ एक ठिकाणी आपले नशीब आजमाविता आले आहे. अंबाजोगाईच्या मतदारांनी मात्र येथील रा.कॉ च्या स्थानिक उमेदवार नमिता मुंदडा यांना पसंती दर्शवली आहे. शहरातून भाजपाच्या संगीता ठोंबरे यांना १०,७९१ मते मिळाली आहेत. तर रा.कॉ च्या नमिता मुंदडा यांना सर्वाधिक १३९४९ ऐवढी मते मिळाली आहेत. केज मतदार संघातून भाजपाच्या संगीता ठोंबरे या विजयी झाल्या असल्या तरी अंबाजोगाई शहरातून राष्ट्रवादी कॉंग्रेसला विजयी उमेदवारापेक्षा ३,१५८ एवढे मताधिक्य मिळाले आहे. शहरातून शिवसेनेच्या कल्पना नरहिरे या चौथ्या स्थानावर असून बहुजन समाज पार्टीचे अ‍ॅड. माणिक अडमाने हे पाचव्या स्थानावर आहेत. विधानसभा निवडणुकीत राज्यात फोल ठरलेला मनसे या पक्षाला अंबाजोगाई शहरातही मतदारांनी नाकारलेले आहे. तर इतर अपक्ष उमेदारांना दोन अंकी संख्याही पार करता आलेली नाही.केज शहरात भाजपाला पसंतीकेज व शहर परिसरात मतदारांनी भाजपाच्या संगीता ठोंबरे यांना पसंती दिली आहे. केज मतदारसंघात राष्ट्रवादी कॉग्रेस व भाजपा या दोन प्रमुख पक्षातच खरी लढत झाली आहे. मात्र मतमोजणीत सुरवातीपासून आघाडी घेतलेल्या संगीता ठोंबरे या विजयी झाल्या आहेत. केज शहरवासीयांनी भाजपाला पसंती दिली आहे. मात्र राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेस या दोन पक्षात घासून मतदान झाले असल्याचे दिसत आहे. भाजपा, रा.कॉ. आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष सोडता इतर पक्ष व अपक्षांचा सुफडा साफ झाला असल्याचे दिसत आहे. भाजपाच्या उमेदवार संगीता ठोंबरे यांना सर्वाधिक ३२१४ मते तर रा.कॉ. च्या नमीता मुंदडा यांना २४१६ व कॉग्रेसच्या अंजली घाडगे यांना १८६१ मतांचाच कौल केज शहरवासीयांनी दिलेला आहे. शिवसेनेच्या कल्पना नरहिरे यांच्या पदरी फक्त १५५ मते पडली आहेत. तर अपक्ष उमेदवारांना शहरवासीयींनी साफ नाकारले असल्याचे दिसत आहे.