चोरट्यांचा धुमाकूळ
By Admin | Updated: March 15, 2015 00:38 IST2015-03-15T00:35:09+5:302015-03-15T00:38:43+5:30
माणकेश्वर : भूम तालुक्यातील माणकेश्वर येथे चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री मोठा धुमाकूळ घातला़ एक दोन नव्हे तब्बल सहा घरे फोडून आतील तीन लाखाचा मुद्देमाल लंपास केला़

चोरट्यांचा धुमाकूळ
माणकेश्वर : भूम तालुक्यातील माणकेश्वर येथे चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री मोठा धुमाकूळ घातला़ एक दोन नव्हे तब्बल सहा घरे फोडून आतील तीन लाखाचा मुद्देमाल लंपास केला़ या घटनेने माणकेश्वरसह परिसरात खळबळ उडाली आहे़
मिळालेल्या माहितीनुसार, माणकेश्वर येथील यासीन महंमद मुखेर हे शुक्रवारी रात्री कुटुंबियांसह घरात झोपले होते़ मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मुख्य दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला़ आतील कपाटाचे लॉक तोडून आतील दागिने, नेकलेस, अंगठ्या, कानातील झुबे, चांदीचे पैंजन, रोख रक्कम असा ऐवज लंपास केला़ तर गावातीलच गणेश विलास अंधारे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला़ घरातील पँटीच्या खिशात ठेवलेले १२ हजार रूपये रो व सोन्याच्या दोन अंगठ्या, कनातील झुबे, मनी असा ५० ते ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ प्रदिप किरमे यांच्या घरातील दोन मोबाईल, पँन्टीच्या शिखातील ३००० रूपये असा ऐवज नेला़ सोमनाथ अंधारे यांच्या घराचा कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला़ मात्र, घरातील मंडळी जागी झाल्याने तेथून त्यांनी पळ काढला़ तसेच संदीप अंधारे, प्रकाश दनाने यांच्या घरातही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला़ एकाच रात्री तीन ठिकाणी हात साफ करून तीन ठिकाणी अयशस्वी प्रयत्न केला आहे़ या प्रकारामुळे माणकेश्वरसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे़ शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत चौकशीची प्रक्रिया सुरू होती़ (वार्ताहर)४
उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथे एका महिलेच्या गळ्यातील सोने हिसकावून पळून जाण्याच्या प्रयत्नातील चोरट्यास ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले़ ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ मिळालेल्या माहितीनुसार, केसरजवळगा येथील एका वृध्द महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून एक चोरटा पळत होता़ त्याला गावातील विनायक क्षीरसागर यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले़ या प्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़