छावणीत चोरट्यांचा धुमाकूळ
By Admin | Updated: March 20, 2016 02:13 IST2016-03-20T02:13:37+5:302016-03-20T02:13:39+5:30
औरंगाबाद : हेल्मेट सक्ती आणि मीटर सक्ती मोहिमेमुळे पोलिसांना गुन्हेगारांकडे लक्ष देण्यास फारसा वेळ मिळेनासा झालाय.

छावणीत चोरट्यांचा धुमाकूळ
औरंगाबाद : हेल्मेट सक्ती आणि मीटर सक्ती मोहिमेमुळे पोलिसांना गुन्हेगारांकडे लक्ष देण्यास फारसा वेळ मिळेनासा झालाय. त्याचाच गुन्हेगारांनी फायदा उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरात चोऱ्या, घरफोड्यांचे प्रमाण वाढत चालले आहे.
शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी छावणी परिसरात धुमाकूळ घातला. येथील बाजारातील एकापाठोपाठ चार दुकाने चोरट्यांनी फोडली. या प्रकाराने परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रात्री घडलेल्या घटनांबाबत मिळालेल्या (पान २ वर)
शहरातील बिघडलेल्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी एकीकडे शहर पोलीस झटत आहेत. शिस्त लावण्याच्या या मोहिमेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या हेल्मेट सक्ती आणि मीटर सक्ती मोहिमेच्या अंमलबजावणीत बहुतांश पोलीस गुंतलेले आहेत.
या मोहिमेमुळे शहर पोलिसांचे गुन्हेगारीकडे साफ दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. पोलिसांच्या या दुर्लक्षाचाच फायदा गुन्हेगारांनी उचलण्यास सुरुवात केली आहे. परिणामी शहरात गेल्या काही दिवसांमध्ये चोऱ्या, घरफोड्यांच्या गुन्ह्यांत मोठी वाढ होत चालली आहे. सर्वसामान्यांना शिस्त लावण्याबरोबरच पोलिसांनी गुन्हेगारांवर ‘वचक’ बसविण्यावर लक्ष द्यावे, अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.