शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगरात थरार; मित्राला शिवी दिल्याच्या रागातून तिघांना भोसकले, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 14:03 IST

मांस कापायच्या सुऱ्याने तिघांवर सपासप वार; अन्य दोघे जखमी, हल्लेखोर मध्यरात्री जेरबंद

छत्रपती संभाजीनगर : शहरात किरकोळ कारणावरून गंभीर गुन्हे घडणे सुरूच आहे. मित्राला शिवीगाळ केल्याच्या किरकोळ कारणातून चिकन शॉपवर काम करणाऱ्याने तीन तरुणांवर मांस कापायच्या सुऱ्याने सपासप वार केले. डोके, छातीत सुरा खुपसला गेल्याने नितीन सोनाजी संकपाळ (३५, रा. राजनगर, मुकुंदवाडी) या तरुणाचा मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ सचिन सोनाजी संकपाळ व मित्र दत्ता बालाजी जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले. गुरुवारी रात्री ८ वाजता मुकुंदवाडी स्मशानभूमीच्या पुढे चिकन शॉपसमोर ही घटना घडली.

नितीनचा सख्खा मोठा भाऊ असलेला सचिन काही दिवसांपूर्वी पुण्याहून शहरात आला होता. दोघांनी मुकुंदवाडी परिसरातील हॉटेलमध्ये जेवणासाठी जाण्याचे ठरवले. जेवण करून बाहेर आले असता तेथे त्यांची दत्तासोबत भेट झाली. तिघे गप्पा मारत असताना त्यांचे कुरेशीच्या दुकानात काम करणाऱ्या मस्तान कुरेशी उर्फ नन्ना (२५) याचा मित्र समीर शेख (रा. मिसारवाडी) सोबत वाद झाले. शेखने शिवीगाळ करत तिघांना धक्काबुक्की केली. नन्नाने अचानक वादात उडी घेत तिघांना शिवीगाळ करून खुनाची धमकी दिली. वाद वाढताच नन्नाने दुकानात जात सुरा आणून तिघांवरही हल्ला चढवला.

डोक्यातच पहिला वारडोके, छातीच्या डाव्या बाजूत खोल वार केल्याने गंभीर जखमी होऊन नितीन रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळला. तरीही नन्नाने सचिन, दत्तावर वार सुरूच ठेवले. गर्दी जमा होताच नन्ना, समीरने धूम ठोकली. घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक निरीक्षक भारत पाचोळे, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक रवी गच्चे, संदीप सोळुंके यांनी घटनास्थळी धाव घेतली.

वाहनचालकांचा जखमींना घेण्यास नकारस्थानिकांनी तिघांना रुग्णालयात नेण्यासाठी वाहनचालकांना थांबण्याची विनंती केली. मात्र, अनेकांनी नकार दिल्याने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास विलंब झाला. मिनी घाटीत नेईपर्यंत नितीनचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वीच नन्नाने साई टेकडी परिसरात नवीन घर घेतले होते. मोबाईल बंद करून तो कुटुंबाला भेटून पळण्याच्या तयारीत होता. मात्र, सहायक निरीक्षक भारत पाचोळे, अंमलदार संजय नंद, हैदर शेख, प्रकाश सोनवणे, परशुराम सोनवणे, संतोष गायकवाड यांनी तत्परतेने त्याला उचलले. नन्नावर यापूर्वी मारहाणीचे दोन गुन्हे दाखल आहेत. समीरचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.

विनाकारण वादात पडलापोलिसांच्या माहितीनुसार, इलेक्ट्रिशियन असलेला समीर नन्नाचा मित्र आहे. वादापूर्वी तोही हॉटेलमध्ये होता. हॉटेलमागे लघुशंका करताना समीरचे तिघांपैकी एकासोबत वाद झाले. हॉटेलसमोर त्यांच्यात वाद उफाळून आल्यावर नन्ना विनाकारण वादात पडला.

सुस्वभावी, सामाजिक क्षेत्रात अग्रेसरनितीन, सचिनच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाल्याने आईनेच त्यांना वाढवले. नितीनची सिडको बसस्थानकाबाहेर अंडा आम्लेट, चहाची गाडी होती. मनमिळाऊ नितीन सामाजिक, धार्मिक कार्यात नेहमी सक्रिय असल्याने नेते, पदाधिकाऱ्यांसाेबत त्याचे चांगले संबंध होते. त्याचा मोठा भाऊ सचिन पुण्याला लिफ्ट मेंटेनन्सचे काम करतो. नितीनला तीन तर सचिनला दोन अपत्ये आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू