वैजापूरनजीक भीषण अपघातात ३ तरुण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 01:12 IST2019-02-23T01:12:33+5:302019-02-23T01:12:47+5:30

वैजापूरनजीक अंबेवाडी फाट्याजवळ शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास ट्रक व कारची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील तीन तरुण जागीच ठार झाले. अर्जुन सोनवणे (बिलोनी, ता. वैजापूर), संतोष वाणी (वैजापूर) व वैभव पुंडे (शिर्डी) अशी मृत तरुणांची नावे आहेत.

 Three youths killed in a horrific accident in Vaijapuram | वैजापूरनजीक भीषण अपघातात ३ तरुण जागीच ठार

वैजापूरनजीक भीषण अपघातात ३ तरुण जागीच ठार

वैजापूर : वैजापूरनजीक अंबेवाडी फाट्याजवळ शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास ट्रक व कारची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील तीन तरुण जागीच ठार झाले. अर्जुन सोनवणे (बिलोनी, ता. वैजापूर), संतोष वाणी (वैजापूर) व वैभव पुंडे (शिर्डी) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
कार बिलोनीकडे येत होती, तर ट्रक वैजापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. या अपघाताची भीषणता एवढी होती की, कार ट्रकच्या आतमध्ये जवळपास तीन फूट घुसली होती. त्यामुळे कारमधील ३ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी वैजापूरचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, पोलीस नाईक संजय घुगे, निलेश पारख तसेच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन कार क्रेनच्या साह्याने बाजूला घेऊन त्या तिघांना बाहेर काढले व वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, या दुर्घटनेनंतर वैजापूर -औरंगाबाद महामार्गावर अर्धा तास वाहतूक ठप्प झाल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Web Title:  Three youths killed in a horrific accident in Vaijapuram