अपघातात तीन तरुण ठार

By Admin | Updated: August 17, 2015 01:03 IST2015-08-17T00:44:34+5:302015-08-17T01:03:02+5:30

वडीगोद्री : नगर जिल्ह्यात झालेल्या अपघातात वडीगोद्री एका पोलिसासह दोन जन तर पाचोड येथील एक असे तीन जण जागीच ठार झाल्याची घटना १५ आॅगस्ट रोजी सकाळी ५

Three young people killed in the accident | अपघातात तीन तरुण ठार

अपघातात तीन तरुण ठार


वडीगोद्री : नगर जिल्ह्यात झालेल्या अपघातात वडीगोद्री एका पोलिसासह दोन जन तर पाचोड येथील एक असे तीन जण जागीच ठार झाल्याची घटना १५ आॅगस्ट रोजी सकाळी ५ च्या सुमारास नगर- पाथर्डी रस्त्यावरील बाराबाभळी गावाच्या शिवारात घडली. गावातील दोन तरूण ठार झाल्याने वडीगोद्री गावाकर शोककळा पसरली. गावात एकही चूल पेटली नव्हती.
अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील वामन शेखर हतागळे हा तरूण पुणे ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. त्याला पुणे येथे सोडण्यासाठी १५ आॅगस्ट रोजी त्याचे मित्र पांडुरंग उर्फ बंडू दतात्र्य बिबे, किशोर विष्णु काळे (रा. वडीगोद्री) व विष्णू कल्याण वाघ (चालक रा. पाचोड) हे कारने जात असताना नगरहून येणाऱ्या दुध वाहतुकीच्या टँकरने सकाळी ५ वाजेच्या सुमारास कारला जोरदार धडक दिली.
यात कार मधील वामन हतागळे (२५)े, किशोर काळे (३३), चालक विष्णु वाघ (२७) हे जागीच ठार झाले. तर पांडूरंग उर्फ बंडु दतात्र्य बिबे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला नगर येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तिघांपैकी दोघांवर वडीगोद्री येथे अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक विष्णू परकर व त्यांच्या पाच सहकाऱ्यांनी हवेत तीन फेऱ्या गोळ्या झाडून पोलिस कर्मचारी वामन हतागळे यांना मानवंदना दिली. यावेळी ग्रामस्थांची व नातेवाईकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (वार्ताहर)

Web Title: Three young people killed in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.