औरंगाबादेत घर मालकाच्या तीन वर्षाच्या मुलाचा खून करणार्यास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 18:29 IST2018-03-13T18:28:42+5:302018-03-13T18:29:24+5:30
घरमालकाच्या तीनवर्षीय मुलाचे अपहरण करून, त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केल्यानंतर त्याचा गळा आवळून खून करणारा आरोपी भाडेकरू रितेश नाडे याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी सोमवारी (दि.१२) खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

औरंगाबादेत घर मालकाच्या तीन वर्षाच्या मुलाचा खून करणार्यास जन्मठेप
औरंगाबाद : घरमालकाच्या तीनवर्षीय मुलाचे अपहरण करून, त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केल्यानंतर त्याचा गळा आवळून खून करणारा आरोपी भाडेकरू रितेश नाडे याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी सोमवारी (दि.१२) खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच अनैसर्गिक कृत्य केल्याबद्दल १० वर्षे सश्रम कारावासही सुनावला. आरोपीला या दोन्ही शिक्षा वेगवेगळ्या भोगावयाच्या आहेत.
राजनगर येथील सुदाम कांबळे यांच्या घरातील भाडेकरूरितेश अभय नाडे (२८) याने १३ जुलै २०१४ रोजी दुपारी सागर कांबळेचे (३ वर्षे) अपहरण केले. सागर हरवल्याची तक्रार आईने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दिली. सहायक पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या पथकाने संशयावरून भाडेकरू रितेशला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करत घर झडती घेतली तेव्हा कपड्याच्या गाठोड्यात सागर बेशुद्धावस्थेत आढळला. शवविच्छेदन अहवालामध्ये सागरवर अनैसर्गिक कृत्य करून त्याचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे रितेश नाडे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी मधुकर साळवे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खून खटल्याच्या सुनावणीत सहायक लोकअभियोक्ता उदय पांडे यांनी १२ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. न्यायवैद्यक अहवाल, तपास अधिकारी आणि मृत सागरच्या आईची साक्ष याप्रकरणात महत्त्वाची ठरली.