तीन घटनांत तिघांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:02 IST2021-06-16T04:02:16+5:302021-06-16T04:02:16+5:30

नाथा भावराव लोंढे (३९, रा. चंदन अपार्टमेंट, राणानगर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, नाथा हे जुना मोंढ्यातील ...

Three suicides in three incidents | तीन घटनांत तिघांच्या आत्महत्या

तीन घटनांत तिघांच्या आत्महत्या

नाथा भावराव लोंढे (३९, रा. चंदन अपार्टमेंट, राणानगर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, नाथा हे जुना मोंढ्यातील राणा शेठ यांच्या चंदन अपार्टमेंट येथे वॉचमन होते. १३ जून रोजी रात्री नाथा हे बाहेरून घरी गेले, तेव्हा भाजीवरून त्यांची पत्नीसोबत कुरबुर झाली. यानंतर ते समोरच्या खोलीत झोपतो असे म्हणून गेले. शेजारच्या खोलीत त्यांची पत्नी, मुलगी आणि मुलगा तर गॅलरीत त्यांची सासू झोपली होती. रात्री १.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या सासूला जाग आली तेव्हा नाथा यांनी छताच्या पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतल्याचे दिसले. याविषयी पुंडलिकनगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

अन्य एका घटनेत हडको एन-१२ येथील विशाल हिरालाल खाजेकर (२६) यांनी १३ जून रोजी रात्री ११ वाजता गळफास घेतला. ही बाब नातेवाइकांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्यांना बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. घरगुती कारणावरून पती - पत्नीतील वादातून विशाल यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले. तिसऱ्या घटनेत कोमल सुनील काकडे (२०, रा. फत्तेपूर शिवार) यांनी कौटुंबिक वादातून १३ जून रोजी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. याविषयी चिकलठाणा शिवारात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक कुंभार तपास करीत आहेत.

Web Title: Three suicides in three incidents