शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
4
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
5
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
6
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
7
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
8
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
9
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
10
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
11
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
12
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
13
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
14
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
15
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
16
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
17
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
18
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
19
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
20
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...

ह्रदयद्रावक... हायवा चालकांच्या ओव्हरटेक स्पर्धेत तीन सख्खी भावंडे चिरडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 05:47 IST

बहिणीसह दोन भावांचा जागीच मृत्यू, कुटुंबच कोलमडून पडले; आईवडिलांच्या आक्रोशाने परिसर हादरून गेला

लोकमत न्यूज नेटवर्क   छत्रपती संभाजीनगर : वाळू वाहणाऱ्या दोन सुसाट व बेफाम हायवा चालकांच्या ओव्हरटेक करण्याच्या स्पर्धेत तीन सख्ख्या भावंडांचा करुण अंत झाला. तिघेही दुचाकीवरून ट्रीपल सीट घरी परतत असताना ते या हायवांच्या चाकाखाली सापडले. थेट अंगावरूनच अवजड हायवा गेल्याने बहीण व दोन भावांचा जागीच मृत्यू झाला. प्रतीक्षा भगवान अंभोरे (२२), प्रदीप ऊर्फ लखन भगवान अंभोरे (२५) व प्रवीण भगवान अंभोरे (२८) अशी मृत भावंडांची नावे आहेत. गुरुवारी सकाळी बीड बायपासवरील हॉटेल पाटीलवाड्यासमोर हा अपघात घडला.   

मैदानी चाचणीत यशस्वी ठरली; पण... nगुरुवारी पहाटे ५ वाजताच तिघेही एकाच दुचाकीवरून शेंद्रा परिसरात गेले होते. nप्रतीक्षाने मैदानी चाचणीदेखील यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्या आनंदात ते तिघेही ९ वाजता घराकडे निघाले.nमात्र, बाळापूर फाट्याजवळ दोन सुसाट हायवा एकमेकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत हाेते.nत्या बेजबाबदार चालकांच्या स्पर्धेत तीन भावंडांच्या दुचाकीला धडक लागली व दुचाकी थेट एका हायवाच्या चाकाखाली सापडली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. हायवा चालक मात्र पसार झाले.

तिघांचे मृतदेह पाहताच वडिलांना धक्काच असह्य तिघांचे मृतदेह घाटीच्या शवविच्छेदनगृहात रवाना करण्यात आले. घटनेची माहिती कळताच सर्व नातेवाइकांनी घाटीत धाव घेतली. मुलांचा किरकोळ अपघात झालाय, असे सांगून आई-वडिलांना शहरात बोलावण्यात आले. लवकरच शासकीय सेवेत रुजू होताना पाहण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आई-वडिलांवर मात्र लाडकी मुलगी व दोन मुलांचे मृतदेह पाहण्याची वेळ आली. आईचा आक्रोश थांबत नव्हता, तर वडिलांना धक्काच असह्य झाला. प्रवीण यांच्या पत्नीला नातेवाइकांना आवरणे कठीण झाले होते.  

मैदान मारले होतेnमूळ जिंतूर तालुक्यातील अकोली येथील अंभोरे कुटुंबातील मोठा मुलगा प्रवीण सातारा परिसरात पत्नी व एक वर्षाच्या मुलासह राहतो. त्यांची लहान बहीण प्रतीक्षा काही महिन्यांपूर्वीच मुंबई पोलिस भरती व वनरक्षक पदाची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली होती. 

सरकारी नोकरीचे स्वप्न अधुरेच प्रतीक्षाला वन परीक्षेच्या लेखी परीक्षेत १२० पैकी ८४, तर मैदानी चाचणीत ८० पैकी ५० गुण प्राप्त झाले होते. मुंबई पोलिस भरतीत ती प्रतीक्षा यादीत होती.निवड होण्यापूर्वीच तिचाकरुण अंत झाला.

घरातील तरुण दोन मुले आणि एक मुलगी अपघातात ठार झाल्याने त्यांच्या आईवडिलांनी हंबरडा फोडला तेव्हा काळीज हेलावले.

 

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस