तीन पोलीस कर्मचाऱ्यांना पदक

By Admin | Updated: April 30, 2017 23:42 IST2017-04-30T23:38:18+5:302017-04-30T23:42:02+5:30

बीड : पोलीस दलात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कारासाठी तीन कर्मचाऱ्यांची निवड झाली

Three police personnel medal | तीन पोलीस कर्मचाऱ्यांना पदक

तीन पोलीस कर्मचाऱ्यांना पदक

बीड : पोलीस दलात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दरवर्षी महाराष्ट्र दिनी पोलीस महासंचालक पदक देऊन कर्मचाऱ्यांना गौरविले जाते. यावर्षीच्या पुरस्कारासाठी तीन कर्मचाऱ्यांची निवड झाली असून त्यांचा सोमवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत गौरव होणार आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयातील नागरी हक्क संरक्षण पथकातील हवालदार सूर्यकांत उर्फ राजाभाऊ गुळभिले, शहर ठाण्यातील पोना शिवाजी खवतड, पोलीस मुख्यालयातील पोना नितीन शिंदे यांचा समावेश आहे. बारा वर्षांपेक्षा अधिक सेवा झालेल्या व उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे पदक दिले जाते.
सोमवारी महाराष्ट्र दिनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहनानंतर पोलीस मुख्यालयावर पारितोषित वितरण होणार आहे. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व पदक असे पुरस्काराचे स्वरुप आहे. महासंचालकांच्या पदकाला पोलीस खात्यात विशेष महत्त्व आहे. या निवडीबद्दल गुळभिले, शिंदे, खवतड यांचे स्वागत होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Three police personnel medal