शहरात आणखी तीन उड्डाणपुलांचे काम सुरू
By Admin | Updated: August 21, 2014 00:11 IST2014-08-21T00:06:40+5:302014-08-21T00:11:14+5:30
शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या जालना रस्त्यावर तीन उड्डाणपुलांची कामे वेगाने सुरू असून, लवकरच हे तिन्ही पूल तयार होतील.

शहरात आणखी तीन उड्डाणपुलांचे काम सुरू
औरंगाबाद : शहरात पाच उड्डाणपुलांची कामे मार्गी लागल्यानंतर आता शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या जालना रस्त्यावर तीन उड्डाणपुलांची कामे वेगाने सुरू असून, लवकरच हे तिन्ही पूल तयार होतील.
नगर रस्त्यावरून औरंगाबाद शहरात येणारी वाहतूक तसेच बसस्थानक ते रेल्वेस्थानकाकडे जाणारी वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी बसस्थानक ते रेल्वेस्थानक रोड या मार्गावर बाबा पेट्रोलपंपाजवळ महावीर चौकात एक उड्डाणपूल होत आहे.
मोंढानाका येथे एक आणि सिडकोमध्ये जळगाव टी पॉइंट येथे वसंतराव नाईक चौकात तिसरा उड्डाणपूल होत आहे. हे तिन्ही पूल मार्गी लागल्यास अहमदनगरकडून जालन्याकडे जाणारी वाहने एक-दोन सिग्नल पास करीत वेगाने जातील. औरंगाबाद शहराचा, परिसराचा वेगाने होणारा विस्तार लक्षात घेता उड्डाणपुलांची निकड लक्षात घेऊन राज्य सरकारने या पुलांना तसेच त्याच्या कामांना तातडीने मंजुरी दिली.