लसीकरणाला गती देण्यासाठी पैठणमध्ये आणखी तीन के्ेंद्र सुरू (वाणिज्य वार्ता)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:05 IST2021-04-09T04:05:06+5:302021-04-09T04:05:06+5:30
पैठण : लसीकरणाची गती वाढावी, यासाठी शासकीय रूग्णालयाव्यतिरिक्त आणखी तीन ठिकाणी गुरुवारी केंद्र उभारून पैठण शहरात लसीकरण मोहिमेस गती ...

लसीकरणाला गती देण्यासाठी पैठणमध्ये आणखी तीन के्ेंद्र सुरू (वाणिज्य वार्ता)
पैठण : लसीकरणाची गती वाढावी, यासाठी शासकीय रूग्णालयाव्यतिरिक्त आणखी तीन ठिकाणी गुरुवारी केंद्र उभारून पैठण शहरात लसीकरण मोहिमेस गती देण्यात आली. नगराध्यक्ष सुरज लोळगे यांच्या हस्ते या लसीकरण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.
शहरात ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथक व डॉ. विष्णू बाबर यांच्या साई हॉस्पिटलमध्ये लसीकरण करण्यात येत आहे. नागरिकांच्या सोयीनुसार
शहरात आणखी काही ठिकाणी केंद्र सुरू करावे, अशी मागणी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी केली होती. त्यानुसार गुरूवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील संत एकनाथ वाचनालय, मिश्रीलाल पहाडे जैन इंग्लिश स्कूल व संत नरहरी महाराज मठ अशा तीन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. नगराध्यक्ष सुरज लोळगे यांच्या हस्ते उद्घाटन केले. प्रथम लस घेणाऱ्या नागरिकांचा नगराध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथकाचे प्रपाठक डॉ. भारत चव्हाण,
नगरसेवक भूषण कावसानकर, रेनुकादास गर्गे, प्रकाश चंडाले, अनिल गर्गे यांची उपस्थिती होती. शहरातील नागरिकांनी कुठलीही शंका मनात न ठेवता लस घ्यावी. कोरोना महामारीच्या लढ्यात सुरक्षित राहावे, असे आवाहन नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी केले.
फोटो : कोरोना लस घेतलेल्या नागरिकांचा नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी सत्कार केला.
080421\1617891946316_1.jpg
लोळगे यांच्या हस्ते ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला