तीन महिन्यात दासबोध लिहून काढला
By Admin | Updated: August 6, 2014 02:15 IST2014-08-06T01:01:53+5:302014-08-06T02:15:57+5:30
जालना : समर्थ दासबोध हा समग्र ग्रंथ तीन महिन्यात लिहून काढल्याबद्दल जालना येथील अशोकराव कृष्णराव देशमुख यांचा श्री समर्थ विद्यापीठ शिवथरच्या वतीने गौरव करण्यात आला आहे.

तीन महिन्यात दासबोध लिहून काढला
जालना : समर्थ दासबोध हा समग्र ग्रंथ तीन महिन्यात लिहून काढल्याबद्दल जालना येथील अशोकराव कृष्णराव देशमुख यांचा श्री समर्थ विद्यापीठ शिवथरच्या वतीने गौरव करण्यात आला आहे.
श्री समर्थसेवा मंडळ सज्जनगड संचलित श्री समर्थ विद्यापीठातर्फे समर्थबोध या विषयावर परीक्षेचे आयोजन करण्यात आले हेते. तीत वृंदावन कॉलनीतील रहिवाशी सेवानिवृत्त अभियंता अशोकराव देशमुख यांनी सहभाग घेतला होता. सन २०१३-१४ मध्ये सदर परीक्षा घेण्यात आली होती. २७ जुलै रोजी देशमुख यांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. देशमुख यांनी यापूर्वी ज्ञानेश्वरी व गीता या ग्रंथाचे स्वत: लिखाण केलेले आहे. समर्थ रामदासस्वामी यांचेवरील नि:स्सीम श्रध्देपोटी व प्रल्हाद महाराज यांच्या प्रेरणेने ग्रंथ लिहिण्याचे धैर्य मिळाले, त्यात जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श केला आहे व सर्व विषयाचे चिंतनही करण्यात आलेले आहे. याकामी राजेंद्र देशमुख, पत्नी स्नेहलता देशमुख, नंदा देशमुख यांचे सहकार्य लाभल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)