तीन सावकारांच्या घरावर धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2017 00:43 IST2017-01-25T00:42:46+5:302017-01-25T00:43:41+5:30

उस्मानाबाद : तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या वतीने मंगळवारी सकाळी शहरातील तीन सावकारांविरूध्द धडक कारवाई करण्यात आली़

Three lenders' house raid | तीन सावकारांच्या घरावर धाडी

तीन सावकारांच्या घरावर धाडी

उस्मानाबाद : तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या वतीने मंगळवारी सकाळी शहरातील तीन सावकारांविरूध्द धडक कारवाई करण्यात आली़ चार पथकांच्या माध्यमातून चार वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत लाखो रूपयांच्या व्यवहाराचे चेक, बाँन्डसह नोंदी आढळून आले आहेत़
उस्मानाबाद शहरातील समता नगर भागातील अभिजित आलूरकर यांनी माणिक चौक परिसरातील बागल प्लॉट येथे राहणाऱ्या दीपक माणिक पवार व संगिता दीपक पवार यांनी चेक व बॉन्ड ठेवून घेत अवाजवी रक्कमेची मागणी सुरू केल्याची तक्रार सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे केली होती़ तर गिता एम्पोरियमचे रतन नानाभाऊ ढोरे यांनी दिनकर वसंतराव मुंडे यांच्याकडील भिषीचे पैसे मिळत नसल्याची तक्रार केली होती़ या दोन तक्रारीनंतर जिल्हा उपनिबंधक के़डी़वाबळे, सहाय्यक निबंधक हनुमंत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार अधिकारी बी़ एच़सावतर, डी़एस़पवार, ए़ आऱ सय्यद व सहकार अधिकारी सुदर्शन शिंदे यांच्या पथकांनी मंगळवारी सकाळी शहरातील चार ठिकाणी धाडी मारल्या़
दिनकर मुंडे यांचे टीपीएस रोडवरील घर, भोसले हायस्कूलसमोरील वैष्णवी नागरी पतसंस्था व बसस्थानक परिसरातील वैष्णवी बॅग सेंटर येथे धाड मारली़ या धडीदरम्यान करारनामे, रजिस्ट्रीची कागदपत्रे, भिषीच्या व्यवहाराचे रजिस्टर, डायऱ्या, बॉन्ड असे लाखो रूपयांचे व्यवहार असलेले कागदपत्रे जप्त करण्यात आली़
माणिक चौकातील बागल प्लॉट भागात राहणाऱ्या संगिता पवार, दीपक पवार यांच्या घरातील कारवाईत ३० कोरे चेक, पाच बॉन्ड, सहा डायऱ्या, भिषीच्या व्यवहाराच्या नोंदी अशा लाखो रूपयाच्या व्यवहाराच्या नोंदी आढळून आल्या़चे यावेळी सांगण्यात आले. या व्यवहारांची चौकशी सुरू असल्याची माहिती सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून देण्यात आली़

Web Title: Three lenders' house raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.