तीन लाखांचे चंदन पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:04 IST2021-04-09T04:04:21+5:302021-04-09T04:04:21+5:30
सिल्लोड : भराडी रस्त्यावर बुधवारी रात्री सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी कारवाई करुन तीन लाख रुपयांचे चंदन पकडले. रात्रीच्या अंधाराचा फायदा ...

तीन लाखांचे चंदन पकडले
सिल्लोड : भराडी रस्त्यावर बुधवारी रात्री सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी कारवाई करुन तीन लाख रुपयांचे चंदन पकडले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तस्कर फरार झाले आहे.
सिल्लोड ते भराडी रस्त्यावरुन चंदन तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ हालचाली करीत बुधवारी रात्री मोढा फाट्यावर सापळा रचला. यावेळी भराडीकडून सिल्लोडकडे जाणारी कार (एमएच २० व्हीसी ०३३२) पोलिसांनी अडवली. कार थांबवित यातील दोघे खाली उतरले. पोलिसांसोबत त्यांनी झटापट करुन अंधाराचा फायदा घेत पोबारा केला. कारची तपासणी केली असता त्यात ६० किलो चंदन सापडले. पोलिसांनी चंदन व कार जप्त केली आहे. ही कारवाई परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउनि. पंडित इंगळे, पोलीस कर्मचारी सचिन सोनार, विष्णू कोल्हे, ठाकूर यांनी केली. याप्रकरणी कार मालक व पळून गेलेल्या आरोपींविरोधात सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेले आरोपी हे भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार येथील असल्याची माहिती समोर आली आहे.
फोटो : सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी याच कारमधून चंदन जप्त केले.
080421\img-20210408-wa0267_1.jpg
सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी याच कारमधून चंदन जप्त केले.