शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

महापालिका निवडणुकीसाठी तीन लाख ९६ हजार मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 12:44 AM

महापालिकेच्या आॅक्टोबर २०१७ मध्ये होणाºया सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी १९ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. महापालिकेसाठी ३ लाख ९६ हजार ३९६ मतदार निश्चित करण्यात आल्या आहेत. महापालिकेने प्रभागनिहाय ही मतदारयादी प्रसिद्ध केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: महापालिकेच्या आॅक्टोबर २०१७ मध्ये होणाºया सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी १९ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. महापालिकेसाठी ३ लाख ९६ हजार ३९६ मतदार निश्चित करण्यात आल्या आहेत. महापालिकेने प्रभागनिहाय ही मतदारयादी प्रसिद्ध केली आहे.महापालिका निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीत मतदार याद्यांचे काम वेगात सुरू होते. राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर शनिवार ही यादी प्रभागनिहाय प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा आयुक्त गणेश देशमुख, निवडणूक विभागाचे उपायुक्त संतोष कंदेवार यांनी दिली. शनिवारी या मतदार याद्या संकेतस्थळावरही टाकण्यात आल्या आहेत. महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारुप मतदार यादीनुसार महापालिकेच्या एकूण २० प्रभागापैकी सिडको या प्रभागात २९ हजार ३१५ असे सर्वाधिक मतदार राहणार आहेत. तर सर्वात कमी मतदार संख्या प्रभाग क्र. ११ हैदरबागमध्ये आहे. येथे १५ हजार ६३१ मतदार आहेत.विधानसभा मतदार यादीतून महापालिकेने प्रभागनिहाय मतदार याद्या केल्या आहेत. त्यात पुरवणी याद्याही जोडण्यात आल्या आहेत. पुरवणी यादीची मतदार संख्या ३ हजार ३७२ इतकी आहे.महापालिकेच्या प्रभाग १ तरोडा खुर्दमध्ये २० हजार ३९६, प्रभाग २ तरोडा बु. मध्ये २० हजार २७५, प्रभाग ३ सांगवीमध्ये १६ हजार ४००, प्रभाग ४ हनुमानगडमध्ये १८ हजार ८४७, प्रभाग ५ भाग्यनगरमध्ये १७ हजार ६८०, प्रभाग क्र. ६ गणेशनगरमध्ये १९ हजार ३९९, प्रभाग क्र. ७ श्रावस्तीनगरमध्ये १७ हजार ६४५, प्रभाग क्र. ८ शिवाजीनगरमध्ये २२ हजार ७४२, प्रभाग क्र. ९ हमालपूरामध्ये १९ हजार १३६, प्रभाग क्र. १० दत्तनगरमध्ये १६ हजार ९६९, प्रभाग क्र. ११ हैदरबागमध्ये १५ हजार ६३१, प्रभाग क्र. १२ उमरकॉलनीमध्ये १७ हजार ६७८, प्रभाग क्र. १३ चौफाळा/ मदिनानगर येथे १८ हजार ३९९, प्रभाग क्र. १४ होळी येथे २२ हजार ५५३, प्रभाग क्र. १५ इतवारा येथे १८ हजार ९१९, प्रभाग क्र. १६ गाडीपुरामध्ये १९ हजार ९५८, प्रभाग क्र. १७ गुरुद्वारा प्रभागात २३ हजार ५३७, प्रभाग क्र. १८ खडकपूरा/ देगावचाळमध्ये २१ हजार ७१८, प्रभाग क्र. १९ वसरणी कौठा येथे १९ हजार १९९ आणि प्रभाग क्र. २० सिडको प्रभागात सर्वाधिक २९ हजार ३१५ मतदार आहेत. तरोडा क्षेत्रिय कार्यालयात प्रभाग १, २, ३, शिवाजीनगर क्षेत्रिय कार्यालयात ४ ते १०, इतवारा क्षेत्रिय कार्यालयात ११ ते १८ आणि सिडको क्षेत्रिय कार्यालयात प्रभाग १९ व २० ची यादी उपलब्ध होणार आहे.