दोन अपघातांत तीन ठार
By Admin | Updated: July 20, 2016 00:31 IST2016-07-19T23:59:36+5:302016-07-20T00:31:08+5:30
गंगापूर/दौलताबाद : औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावरील ढोरेगावजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.१८) रात्री १२ वाजता घडली.

दोन अपघातांत तीन ठार
गंगापूर/दौलताबाद : औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावरील ढोरेगावजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.१८) रात्री १२ वाजता घडली. याच ट्रकने दिलेल्या धडकेत आणखी एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळावरून चालक ट्रक सोडून पळून गेला. या प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, सोमवारी रात्री १२ वाजेदरम्यान पेंडापूर फाट्यावर एका ढाब्यासमोर उतरून पेंडापूरकडे पायी जाणारे कचरू केशव तुपे (५०) रा. बाबरगाव व लक्ष्मण नाना आल्हाट (५०), रा. मांजरी या दोघांना औरंगाबादहून- अहमदनगरकडे जाणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच-४३ ई-७११५) जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर सदर ट्रकचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ढोरेगाव येथे पुन्हा एका दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. यानंतर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी पाठलाग करून सदर ट्रक पकडला. मात्र, चालक ट्रक सोडून पळून गेला.
या प्रकरणी तुपे यांच्या मुलाच्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध निष्काळजी व भरधाव ट्रक चालवून दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पो.नि. मुकुंद अघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. गजेंद्र इंगळे, बी.आर. वैद्य करीत आहेत.