औरंगाबाद खंडपीठातील तीन न्यायमूर्तींसह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:04 IST2021-05-28T04:04:57+5:302021-05-28T04:04:57+5:30
औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयातील नऊ अतिरिक्त न्यायमूर्तींची कायम न्यायमूर्ती म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये ...

औरंगाबाद खंडपीठातील तीन न्यायमूर्तींसह
औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयातील नऊ अतिरिक्त न्यायमूर्तींची कायम न्यायमूर्ती म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
यामध्ये औरंगाबाद खंडपीठातील न्या. नितीन भगवंतराव सूर्यवंशी, न्या. मुकुंद गोविंदराव सेवलीकर आणि न्या. बी. यू. देबडवर यांचा समावेश आहे. याशिवाय न्या. अविनाश जी. घारोटे, अनिल एस. किलोर, न्या. मिलिंद एन. जाधव, न्या. वीरेंद्रसिंग जि. बिस्त, न्या. मुकुलिका एस. जवळकर, न्या. सुरेंद्र पी. तावडे आणि न्या. नितीन आर. बोरकर यांचीही कायम न्यायमूर्ती म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. केंद्रीय विधी व न्याय विभागाने गुरुवारी (दि. २७ मे) रोजी याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे.