तीन तास महामार्ग ठप्प
By Admin | Updated: May 30, 2014 00:26 IST2014-05-29T23:51:29+5:302014-05-30T00:26:33+5:30
येणेगूर: उमरगा तालुक्यातील येणेगूरसह महालिंगरायवाडी, मुरूममोड, नळवाडी परिसरात गुरूवारी दुपारी जोरदार पाऊस झाला़

तीन तास महामार्ग ठप्प
येणेगूर: उमरगा तालुक्यातील येणेगूरसह महालिंगरायवाडी, मुरूममोड, नळवाडी परिसरात गुरूवारी दुपारी जोरदार पाऊस झाला़ अनेक झाडे उन्मळून पडल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती़ तर मुरूम शिवारात वीज पडून वृध्द शेतमजुराचा मृत्यू झाला़ येणेगूर व परिसरात जवळपास अर्धा तास वादळी वार्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली़ मुरूम मोड ते येणेगूरदरम्यान ठिकठिकाणी मोठमोठी झाडे रस्त्यावर उन्मळून पडली होती़ घटनेनंतर मुरूम पोलिस ठाण्याचे सपोनि एस़पी़सिरसाठ, महामार्गचे पोउपनि जे़एम़तांबोळी, येणेगूर दूरक्षेत्राचे गोरोबा कदम, चंदू पवार, बिभिषण देडे, किरण औताडे, शिवलिंग घोळसगाव, नामदेव जाधव आदींनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली़ तर झाडे तोडणारे खान यांच्याकडील मजूर युनूस शेख, अशोक गायकवाड, दत्ता पवार, फतम शेख, महारूद्र कांबळे, वाल्मिक कोळी, रणजित चव्हाण, सुनील चव्हाण यांनी यंत्रणांद्वारे झाडे तोडून रस्त्याच्या बाजूला केली़ मुरूम येथील डावल जमालसाब मासूलदार (वय-६०) हे शहराच्या शिवारातील रविंद्र अंबर यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली पाऊस येत असल्याने थांबले होते़ त्यावेळी वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला़ तर मानेवाडी येथील राम भुसार, श्रीपती जाधव, गहिनीनाथ जाधव, लक्ष्मण रामतीर्थकर, अमोल पाटील यांच्या इतरांच्या घरावरील पत्रे उडाले़ येणेगूर शिवारातील श्रीकांत मंगरुळे यांच्या गोठ्यावरील तर नागेश भैरप्पा यांच्यासह इतरांच्या घरावरील पत्रे उडून गेले. विजेच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता़ मुरूम मोड, दाळींब शिवारात भास्कर जाधव यांच्या शेतातील विद्युत ताराही तुटल्या होत्या़ (वार्ताहर)