लातूर : सहाय्यक कामगार आयुक्तांच्या कार्यालयात सहाय्यक कामगार आयुक्तांसह अन्य एक कर्मचारी असल्याने बालकामगार शोध मोहिमेसह अन्य कामगार योजनांची अनेक कामे ठप्प झाली आहेत़ सहाय्यक कामगार आयुक्त आणि अन्य एका कर्मचाऱ्यावर तीन जिल्ह्याचा कारभार सुरु असून, एकूण १५ जागा रिक्त असल्याने दोघांनाही कसरत करावी लागत आहे़
लातूरच्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडे लातूर, उस्मानाबाद आणि बीड या तीन जिल्ह्याचा कारभार आहे़ या तीन जिल्ह्यासाठी कामगाराचे लातुरात विभागीय कार्यालय आहे़ या कार्यालयात सहाय्यक आयुक्तांसह एक निरीक्षक आहे़ या दोघांवरच कार्यालयीन कामकाज चालत आहे़ किमान वेतन निरीक्षक, दुकाने निरीक्षक, क्लार्क, स्टेनो आदींची १५ पदे रिक्त आहेत़ त्यामुळे इन्सपेक्शन नाही, धाडसत्र नाही, दुकानांची तपासणी नाही, शिवाय कामगारांच्या प्रश्नांकडेही लक्ष देणे होत नाही़ मनुष्यबळाअभावी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत़ जिल्हा कार्यालयातील आणि विभागीय कार्यालयातील हीच अवस्था असल्याने सहाय्यक कामगार आयुक्त हतबल झाले आहेत़ ‘लोकमत’ने शुक्रवारच्या अंकात लातूर शहरात बालकामगारांचे कसे शोषण केले जाते़ याचे स्टींग आॅपरेशन करुन बालकामगारांचा प्रश्न ऐरणीवर घेतला आहे़ दरम्यान शुक्रवारी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात कर्मचारी नसल्याचे निदर्शनास आले आहे़ सहाय्यक कामगार आयुक्त चव्हाण आणि एक कर्मचारी या दोघांवरच तीन जिल्ह्याचा भार आहे़ त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या बालकामगार सल्लागार मंडळाची बैठक होऊ शकली नाही़ शिवाय धाडसत्र समितीचीही बैठक नाही़
गेल्या वर्षभरांपासून कर्मचाऱ्यांचा वनवा आहे़ लातूरच्या कार्यालयाला विभागीय कार्यालयाचा दर्जा आहे़ परंतु कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे़ विभागीय कार्यालयाच्या नियमानुसार कर्मचारी दिले गेले नाहीत़ त्यामुळे कामगार कार्यालयाचे काम ठप्प झाले आहे़ (प्रतिनिधी)
बालकामगार सल्लागार मंडळाने चार वर्षांपूर्वी धाडी टाकून बालकामगारांची सुटका केली होती़ त्यावेळी समितीने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करुन १२ लाखांचा दंड वसूल केला आहे़ दंडाचा हा निधी बँकेत जमा असून त्याचे व्याज मिळून तो वाढला असेल परंतु गेल्या अडीच वर्षांपासून समितीचे काम कर्मचाऱ्याअभावी ठप्प आहे़ तरीही यातून मार्ग काढून बालकामगारांचा शोध घेऊन पुर्नवसन करण्याचा प्रयत्न केला जाईल़ शिवाय कामगारांच्या प्रश्नांकडेही लक्ष दिले जाईल, असे सहाय्यक कामगार आयुक्त पवनकुमार चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़
कामगार अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतल्यानंतर कारवाईचे धोरण ठरविले जाईल. बालकामगार सल्लागार मंडळ व धाडसत्र समितीच्या बैठका आणि कामकाज का ठप्प झाले, याचाही आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. गावंडे यांनी सांगितले.
लातूर शहरातील हॉटेल, बिअर बार, विटभट्ट्यांवर बालकामगारांना मजूरीवर ठेवण्यात येत असल्याचे ‘लोकमत’च्या बातमीवरुन कळाले आहे़ शहरामध्ये अशा सर्व दुकानांची तपासणी करुन ज्या ठिकाणी बालकामगार आढळून येतील, त्या मालकांवर दंडात्मक कारवाईसह न्यायालयात खटले दाखल करण्याची कारवाई केली जाईल़ त्या अनुषंगाने कामगार अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात येत आहेत़ येत्या दोन दिवसात कामगार अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जाईल़ धाडसत्र समिती व बालकामगार सल्लागार मंडळाची ही बैठक घेऊन यावर निर्णय घेतला जाईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ़विश्वंभर गावंडे यांनी सांगितले़
तीन जिल्ह्यांचा कारभार दोघांवर !
By admin | Updated: November 29, 2014 00:29 IST
लातूर : सहाय्यक कामगार आयुक्तांच्या कार्यालयात सहाय्यक कामगार आयुक्तांसह अन्य एक कर्मचारी असल्याने बालकामगार शोध मोहिमेसह अन्य कामगार योजनांची अनेक कामे ठप्प झाली
तीन जिल्ह्यांचा कारभार दोघांवर !
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}