परतूर शहरात आढळले तीन डेंग्यूसदृश्य बालके

By Admin | Updated: August 25, 2014 01:36 IST2014-08-25T00:30:52+5:302014-08-25T01:36:29+5:30

शेषराव वायाळ , परतूर शहरात डेंग्यूसदृश्य तापाचे तीन बालके आढळली असून यातील एक मुलगी अत्यवस्थ असल्याने तिला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे

The three dengue viscosity seen in the village of Pururur | परतूर शहरात आढळले तीन डेंग्यूसदृश्य बालके

परतूर शहरात आढळले तीन डेंग्यूसदृश्य बालके


शेषराव वायाळ , परतूर
शहरात डेंग्यूसदृश्य तापाचे तीन बालके आढळली असून यातील एक मुलगी अत्यवस्थ असल्याने तिला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. या तिन्ही बालकांना उपचारासाठी जालना येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शहरातील आंबेडकर नगर मधील गौतमी सुधाकर पाडेवार (वय ६), कादंबरी सुधाकर पाडेवार (वय ६ वर्षे) या जुळ्या बहिणींसह शुभम सुधाकर पाडेवार (वय ७) ही तिन्ही भावंडे पाच-सहा दिवसांपासून तापाने फणफणली. पालकांनी परतूर येथे या बालकांवर प्राथमिक उपचार घेतले. मात्र ताप राहत नसल्याने पुढील उपचारासाठी या बालकांना जालना येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.
कादंबरी पाडेवार ही अत्यवस्थ असल्याने तिला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. या बालकांना डेंग्यूसदृश्य आजार असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. मानधने यांनी सांगितले. आंबेडकर नगर भागात मागील आठवड्यापासून अनेक रुग्ण तापाने फणफणत आहेत.
या ठिकाणी नागरिकांनी कळवूनही आरोग्य विभागाचे पथक अद्याप इकडे फिरकले देखील नसल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालिकेकडून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचेही या ठिकाणच्या रहिवाशांनी सांगितले. या भागात नाल्याही तुंबलेल्या आहेत. त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाने याबाबत गांभिर्याने दखल घ्यावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.
पाडेवार यांच्या राहत्या घराच्या परिसरात सांडपाण्याची कसलीही व्यवस्था नाही.
घरासमोरील नाली महिनाभरापासून तुंबलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठी दुर्गंधी आहे. पालिकेकडून या भागात स्वच्छता केली जात नाही. काही वेळा या भागात दूषित पाणीपुरवठा होतो.
यासंदर्भात मानव अधिकार आॅर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष अर्जुन पाडेवार म्हणाले की, या भागात बऱ्याच दिवसांपासून अनेक रुग्ण तापाने फणफणत आहेत. याबाबतची माहिती संबंधित विभागाला वेळोवेळी दिली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या भागात स्वच्छतेकडे व पाणी शुद्धीकरणाकडेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पाडेवार यांनी केला.
४आई-वडील मोलमजुरी करीत असल्याने दवाखान्यातील उपचाराचा खर्च या कुटुंबाला झेपवत नाही. अचानक तिन्ही भावंडे रुग्णालयात दाखल झाल्याने व तापही डेंग्यूसदृश्य असल्याने हे कुटुंबिय भयभीत झाले आहे. एकुलता एक मुलगा अत्यवस्थ असल्याने कुटुंबिय हादरले आहेत.

Web Title: The three dengue viscosity seen in the village of Pururur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.