पाझर तलावात बुडून तीन मुलांचा मृत्यू

By Admin | Updated: May 8, 2017 04:19 IST2017-05-08T04:19:06+5:302017-05-08T04:19:06+5:30

दोन दिवसांपूर्वी खेळायला गेलेल्या तीन शाळकरी मुलांचे मृतदेह रविवारी रांजणगाव शेणपुंजी पाझर तलावात तरंगताना आढळले

Three children die drowning in the percolation tank | पाझर तलावात बुडून तीन मुलांचा मृत्यू

पाझर तलावात बुडून तीन मुलांचा मृत्यू

औरंगाबाद : दोन दिवसांपूर्वी खेळायला गेलेल्या तीन शाळकरी मुलांचे मृतदेह रविवारी रांजणगाव शेणपुंजी पाझर तलावात तरंगताना आढळले. मात्र, ही मुले पोहायला गेल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले.
राहुल सुभाष साबळे (१४), दीपक संजय आहिरे (१३) व प्रकाश विजय राजपूत (१३) ही मुले शुक्रवारी खेळायला म्हणून घराबाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली. मात्र, त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात हे तिघे बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली.
मात्र, रविवारी तिघांचे मृतदेह रांजणगाव शेणपुंजी येथील पाझर तलावात आढळले. तलावाच्या काठावर या मुलांचे कपडे, चप्पल मिळून आली आहे. त्यामुळे ही मुले पोहायला गेली असावी आणि पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असावा. शवविच्छेदन अहवालातही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन झाले आहे, असे फौजदार ताहेर पटेल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Three children die drowning in the percolation tank