शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

भाजयुमोच्या जिल्हाध्यक्षासह तीन आरोपी अखेर गजाआड

By admin | Updated: November 6, 2014 01:19 IST

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यावरच चाकूने हल्ला करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यावरच चाकूने हल्ला करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता. या गुन्ह्यात गेल्या महिनाभरापासून फरार असलेला भाजयुमोचा जिल्हाध्यक्ष मनोज भारस्करसह तीन आरोपींना सिडको पोलिसांनी काल रात्री अटक केली.आरोपींमध्ये मनोज परमेश्वर भारस्कर (रा. गजानन मंदिर परिसर), विशाल रामदास गायके (रा. पुंडलिकनगर) व याग्निक भूपेंद्र पटेल (रा. सिडको, एन-५) यांचा समावेश आहे. घटनेबाबत माहिती देताना फौजदार गोरख चव्हाण यांनी सांगितले की, १ आॅक्टोबर रोजी सिडकोत भाजपाची प्रचार रॅली सुरू होती. त्यावेळी भाजपा कार्यकर्ते मयूर वंजारी यांच्या पायाचा धक्का लागल्याच्या कारणावरून मनोज भारस्करने वाद घातला. तेथे इतर कार्यकर्त्यांनी मध्यस्ती करून हे प्रकरण मिटविले. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मनोज भारस्कर हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध सिटीचौक, सिडको, एमआयडीसी वाळूज, सातारा, क्रांतीचौक या पोलीस ठाण्यांमध्ये एकूण दहा गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.