जिवे मारण्याची धमकी; साक्षीदारास संरक्षण

By Admin | Updated: October 16, 2016 01:14 IST2016-10-16T00:49:02+5:302016-10-16T01:14:06+5:30

औरंगाबाद : दोन वर्षांपूर्वी बनावट वाद घालून एका शाळेचे ५२ लाख रुपये आरोपींनी पळविले होते. त्या रकमेच्या ‘जप्ती पंचनाम्या’चे साक्षीदार

The threat of death; Witness Protection | जिवे मारण्याची धमकी; साक्षीदारास संरक्षण

जिवे मारण्याची धमकी; साक्षीदारास संरक्षण


औरंगाबाद : दोन वर्षांपूर्वी बनावट वाद घालून एका शाळेचे ५२ लाख रुपये आरोपींनी पळविले होते. त्या रकमेच्या ‘जप्ती पंचनाम्या’चे साक्षीदार बाबासाहेब किसन चौधरी यांना सदर प्रकरणात न्यायालयात साक्ष दिल्यास जिवे मारण्याच्या आणि खोट्या गुन्ह्यात गोवण्याच्या धमक्या आरोपींच्या नातेवाईकांनी प्रत्यक्ष आणि मोबाईलवरून दिल्याचा लेखी अर्ज चौधरी यांनी न्यायालयात दाखल केला. सत्र न्यायाधीश आर.आर. काकाणी यांनी त्याची त्वरित दखल घेत सिडको एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस आयुक्त यांना सदर प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. तसेच या प्रकरणातील साक्षीदारांना संरक्षण देण्याचे आदेशित केले.
शहरातील सेंट झेव्हियर्स एज्युकेशन ट्रस्टचे व्यवस्थापक दीपक पद्मनाभ पुजारी यांच्या कारमधील ५२ लाख रुपये असलेली बॅग तिघांनी पळविली. फिर्यादीने घटनास्थळावर एका आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. अटकेतील आरोपीच्या मोबाईलवरून मिळविलेल्या नंबरच्या आधारे पोलिसांनी सदर गुन्ह्यातील इतर चार आरोपींना त्याच दिवशी अटक केली होती. सदर प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. सदर प्रकरणात साक्ष देण्यासाठी बाबासाहेब चौधरी न्यायालयात आले असता त्यांनी वरीलप्रमाणे लेखी अर्ज सादर केला. तसेच तोंडी माहिती दिली की, त्यांना २६ सप्टेंबर २०१६ ते ४ आॅक्टोबर २०१६ दरम्यान वेळोवेळी दोन मोबाईलवरून साक्ष दिल्यास जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. त्याची न्यायालयाने त्वरित दखल घेत साक्षीदाराला संरक्षण देण्याचे आदेशित केले.

Web Title: The threat of death; Witness Protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.