‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये धावणार हजारो धावपटू; मोजकेच दिवस शिल्लक, तत्काळ करा नोंदणी

By जयंत कुलकर्णी | Published: December 11, 2023 03:56 PM2023-12-11T15:56:10+5:302023-12-11T15:56:51+5:30

मॅरेथॉनमध्ये २१ आणि १० किमीमध्ये सहभागी झाल्यानंतर १२ लाखांपर्यंत असणार पारितोषिके.

Thousands of runners will run in 'Lokmat Mahamarathon'; Only a few days left, register now | ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये धावणार हजारो धावपटू; मोजकेच दिवस शिल्लक, तत्काळ करा नोंदणी

‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये धावणार हजारो धावपटू; मोजकेच दिवस शिल्लक, तत्काळ करा नोंदणी

छत्रपती संभाजीनगर : विभागीय क्रीडा संकुलावर १७ डिसेंबर रोजी ‘लोकमत महामॅरेथॉन’चा थरार रंगणार आहे. या ऐतिहासिक महोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी आतापर्यंत हजारो धावपटूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशनसाठी मोजकेच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे ज्यांना या महोत्सवाचे साक्षीदार व्हायचे असेल, त्यांनी आता तत्काळ आपली नोंदणी करा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, ‘लोकमत महामॅरेथॉन’निमित्त यंग रनर ग्रुपतर्फे आयोजित विभागीय क्रीडा संकुलापासून १० किमी आणि ६ किमी अंतराच्या प्रॅक्टिस रन चैतन्यपूर्ण वातावरणात पार पडली. पहाटे रिलॅक्स झिलच्या टीमने प्रथम सहभागी धावपटूंकडून वार्मअप करून घेतला. त्यानंतर सकाळी सव्वासहा वाजता सुरू झालेल्या प्रॅक्टिस रनचा मार्ग क्रीडा संकुल, सेव्हन हिल, क्रांती चौक, हॉटेल व्हिट्स, भाजीवालीबाई पुतळा, दर्गा, क्रीडा संकुल यादरम्यान होता. सहभागी धावपटूंना ‘लोकमत समूहा’तर्फे धावण्याच्या मार्गात वॉटर सेशन व ब्रेकफास्टची व्यवस्था करण्यात आली होती. प्रॅक्टिस रनला महामॅरेथॉनचे रेस डायरेक्टर संजय पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी सहभागी धावपटूंनी ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या उपक्रमांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

१२ लाखांपर्यंत बक्षिसे
मॅरेथॉनमध्ये २१ आणि १० किमीमध्ये सहभागी झाल्यानंतर १२ लाखांपर्यंत असणार पारितोषिके. तसेच ३ आणि ५ किमीमधील स्पर्धकांना मिळणार मेडल आणि प्रमाणपत्रे. यंदा होणारी महामॅरेथॉन ३ किमी, ५ किमी, १० किमी आणि २१ किमी अंतरात होणार आहे. दि. १७ डिसेंबर रोजी होणाऱ्या महामॅरेथॉनसाठी धावपटू, नागरिक गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध मैदानांवर कसून सराव करीत आहेत.

ऑनलाइन नोंदणीसाठी: 
http://tiny.cc/LokmatAurangabad या लिंकवर किंवा क्यूआर कोड स्कॅन करून सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना वैयक्तिक आणि ग्रुप रजिस्ट्रेशनही करता येणार आहे. अधिक माहितीसाठी ९४२३९३१८७३, ८०५५५६२१२१, ७३८७३३३८७८, ८९९९६११९५४ या क्रमांकांवर संपर्क साधा.

Web Title: Thousands of runners will run in 'Lokmat Mahamarathon'; Only a few days left, register now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.