तलाव आटल्याने हजारो माशांचा तडफडून मृत्यू
By Admin | Updated: July 7, 2014 00:12 IST2014-07-06T23:44:22+5:302014-07-07T00:12:28+5:30
हाळी हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी परिसरात दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत आहेत़ त्यामुळे हाळी हंडरगुळी परिसरातील जलस्त्रोत आटत चालले आहेत़

तलाव आटल्याने हजारो माशांचा तडफडून मृत्यू
हाळी हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी परिसरात दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत आहेत़ त्यामुळे हाळी हंडरगुळी परिसरातील जलस्त्रोत आटत चालले आहेत़ खरबवाडी शिवारातील साठवण तलाव आटत चालल्याने या तलावात दिवसाकाठी हजारो मासे तडफडून मरू लागले आहेत़
तीन वर्षांपूर्वी खरबवाडी साठवण तलावाची निर्मिती करण्यात आली़ या तलावामुळे हाळी व हंडरगुळी शिवारातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या़ शिवाय मत्स्य व्यवसायालाही चालना मिळाली़ त्यातून अनेकांना रोजगार मिळाला़ गतवर्षी साठवण तलाव पूर्ण भरला होता़ मात्र, मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा झाल्याने व जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस न पडल्याने हा तलाव पूर्णपणे आटत आला आहे़ परिणामी, या तलावातील मासे तडफडत असल्याचे चित्र दिसून येत आहे़ (वार्ताहर)