शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

आसना नदीपात्रात हजारो मासे मृत्युमुखी

By admin | Updated: July 19, 2014 00:45 IST

नांदेड : दूषित पाण्यामुळे आसना नदीपात्रात हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत़ यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे़

नांदेड : दूषित पाण्यामुळे आसना नदीपात्रात हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत़ यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे़नांदेड शहरालगत आसना नदी वाहते़ गाडेगाव शिवारात सुमारे दोन किलोमीटर परिसरात आसनेचे पाणी अडवून ठेवण्यात आले आहे़ येथील पाणी पूर्णत: दूषित झाले असून त्याचा रंगही बदलल्याचे दिसून येत आहे़ दोन दिवसांपासून नदीपात्रात हजारो जलचर प्राणी मृत्युमुखी पडले आहेत़ मृत मासे पाण्यावर तरंगत असून यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे़ आयते खाद्य मिळाल्याने बगळे व अन्य पक्षांचे थवे मृत माशांवर ताव मारण्यासाठी गर्दी करत आहेत़ मात्र दूषित पाण्यामुळे आसना पात्रातील जलजीवन धोक्यात आले आहे़ दूषित पाण्यामुळे केवळ मासेच नव्हे, तर साप व अन्य जलचर प्राणीही मृत्युमुखी पडल्याचे दिसून येते़ आसना नदीपात्रालगत अनेक शेतकरी पशूसह शेतात वास्तव्यास आहेत़ पाऊस नसल्याने बोअरवेल, विहिरी आटल्या आहेत़ त्यामुळे जनावरांना पाणी पाजवण्यासाठी शेतकरी आसना नदीपात्रात आणतात़ परंतु आसनेचे पाणी दूषित बनल्याने हे पाणी जनावरांना पाजवण्यास शेतकरी धजावत नाहीत़ शिवाय दुर्गंधीने परिसरात रोगराई पसरुन येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ (प्रतिनिधी)