शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

सद्भावना राखण्यासाठी एकजुटीने धावले हजारो औरंगाबादकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 23:39 IST

‘सामाजिक सलोखा’, ‘पाणी वाचवा, झाडी जगवा’, ‘बेटी बचाव, बेटी पढ़ाव’चा संदेश देत आणि सामाजिक सद्भावना राखण्यासाठी आयोजित ‘रन फॉर औरंगाबाद’ या उपक्रमात सहभागी होत हजारो औरंगाबादकर एकजुटीने धावले.

ठळक मुद्देप्रशासनाच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद : पाच वर्षांच्या बालकांसह वृद्ध, महिला, शाळकरी विद्यार्थ्यांचा सहभाग

औरंगाबाद : ‘सामाजिक सलोखा’, ‘पाणी वाचवा, झाडी जगवा’, ‘बेटी बचाव, बेटी पढ़ाव’चा संदेश देत आणि सामाजिक सद्भावना राखण्यासाठी आयोजित ‘रन फॉर औरंगाबाद’ या उपक्रमात सहभागी होत हजारो औरंगाबादकर एकजुटीने धावले.शहर पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हा परिषदेतर्फे शनिवारी रात्री ७.३० वाजता ‘रन फॉर औरंगाबाद’ हा ५ किलोमीटर धावण्याचा उपक्रम घेण्यात आला. महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, विशेष पोलीस महानिरीक्षक रविंदर सिंगल, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, लोकमत महामॅरेथॉनच्या संचालिका रुचिरा दर्डा, एमजीएमचे उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी ध्वज दाखवून ‘रन फॉर औरंगाबाद’चा शुभारंभ केला. तत्पूर्वी, रिलॅक्स झीलच्या वतीने दहा मिनिटे वॉर्मअप करण्यात आले. त्यानंतर ही दौड क्रांतीचौकातून रेल्वेस्टेशन रस्त्यावरील एमटीडीसी कार्यालयापर्यंत गेली. तेथून वळण घेऊन परत क्रांतीचौकात या दौडची सांगता करण्यात आली. शहरात शांतता नांदावी याकरिता आयोजित या स्तुत्य उपक्रमात रुचिरा दर्डा यांच्यासह लोकमत महामॅरेथॉनची संपूर्ण टीम सहभागी झाली होती. या उपक्रमाचे स्वागत करीत असे आणखी उपक्रम शहरात होतील, अशी आशा टीम मेम्बर्सनी व्यक्त केली.या दौडमध्ये सुमारे साडेतीन ते चार हजार औरंगाबादकर मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. यात शहरातील उर्दू, मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या विविध शाळांतील विद्यार्थी, विद्यार्थिनी गणवेशात सहभागी झाल्या. भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेतील तरुण, तरुणींचा सहभाग लक्षणीय होता.यावेळी जिल्हाधिकारी चौधरी यांनी सामाजिक सलोखा, पाणी बचत, बेटी बचाव, बेटी पढ़ाओ हा संकल्प आज करूया, असे आवाहन केले. विशेष पोलीस महानिरीक्षक सिंगल आणि पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करताना शहरात सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले, तसेच यापुढे शहरात शांतता नांदेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.शिव स्वराज्य प्रतिष्ठानच्याढोल पथकाने आणली रंगत‘रन फॉर औरंगाबाद’ सुरू होण्यापूर्वी शिव स्वराज्य प्रतिष्ठानच्या ढोल पथकाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. या ढोल पथकाने उत्तम आणि शिस्तबद्ध सादरीकरण करून धावपटूंचा उत्साह वाढविला..८५ वर्षीय चौहान यांचा सहभागया स्तुत्य उपक्रमात ८५ वर्षीय सुरेंद्र चौहान हे त्यांची व्हिंटेज कार घेऊन आले होते. त्यांचा उत्साह पाहून पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी स्टेजवर बोलावून त्यांना मनोगत व्यक्त करायला लावले. यावेळी चौहान यांनी हम सब एक है, असे म्हटले आणि हजारो नागरिकांनी टाळ्या वाजवून त्यांना साद दिली.यांची झाली मदतहेल्प रायडर्सचे संदीप कुलकर्णी, राजाभाऊ जाधवर, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉ. रश्मी बोरीकर, डॉ. अनुपम टाकळकर, डॉ. सोमाणी, मुकुंद भोगले, प्रकाश बोर्डे, रिलॅक्स झिलचे संजय पाटील, शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे सुमित पवार, रोशन जैसवानी.वाहतूक शाखेचा बंदोबस्त‘रन फॉर औरंगाबाद’ या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपायुक्त मीना मकवाना, सहायक आयुक्त एच. एस.भापकर, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक उत्तम मुळक, वाहतूक शाखेच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांनी पुढाकार घेतला. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज, उपनिरीक्षक सरला गाडेकर आणि कर्मचाऱ्यांनी क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊ दिली नाही.दोन मुलींना आली चक्करदौडमध्ये गरुडझेप अकादमीच्या दोन मुलींना चक्कर आल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.एनर्जी ड्रिंक आणि पाण्याची सुविधा‘रन फॉर औरंगाबाद’च्या मार्गावर अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी आणि एनर्जी ड्रिंकची व्यवस्था करण्यात आली होती. धावपटू या एनर्जी ड्रिंक आणि पाण्याचा लाभ घेत होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक