शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका

By बापू सोळुंके | Updated: May 18, 2024 16:48 IST

मराठा समाजाने कधीपर्यंत सहन करायचं? मनोज जरांगे यांचा सवाल

छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुकीदरम्यान पाया पडते, पदर पसरते, असे गोड बोलता, नंतर मात्र माझ्या समाजावर गुरगुर करता, माझ्या समाजाने हे का सहन करायचे? असा सवाल करीत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बीड लोकसभेच्या भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांना नाव न घेता लक्ष्य केले. प्रकृती खालावल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना शुक्रवारी शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी पत्रकारांनी त्यांच्याशी रुग्णालयात जाऊन संवाद साधला. 

जरांगे पाटील म्हणाले की, सततच्या दौऱ्यामुळे तब्येत खालावली होती. आज बरं वाटतय म्हणून तुमच्यासोबत बोलत आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीत आम्ही कोणाला पाठिंबा दिला नाही. आता पाचव्या टप्प्यातील निवडणूक होत आहे. नाशिक मतदारसंघामध्ये मी पाठिंबा दिल्याच्या पोस्ट फिरल्याचे कळाले आहे. मात्र, मी कोणाला पाठिंबा दिला नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. निवडणुकीत लोक तुमच्या पाया पडतील, मात्र तुम्ही आपल्या मुलांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहा, भावनिक होऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.

मराठा समाजाने किती सहन करायचे बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटत असल्याकडे जरांगे पाटील यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, मराठा समाजाने कधीही जातीवाद केला नाही. आज मी दोन्ही समाजाला आवाहन करतो की, दोन जातीत शांतता राहिली पाहिजे. ते लोक निवडणुकीपुरंत गोड बोलतात, नंतर मात्र समाजावर गुरगुर करतात, माझ्या समाजाने हे कधीपर्यंत सहन करायचं असा सवाल त्यांनी केला. या प्रकारामुळे आमच्या पोरांमध्ये प्रचंड रोष असल्याचे जरांगे म्हणाले.

...त्यांना प्रामाणिक समजत होतो धनंजय मुंडे यांना मी प्रमाणिक समजत होतो. मात्र आता काही दिवसात ते पण कसे आहे हे, समोर आले आहे. माझ्या पाच पिढ्यांनी त्यांना विरोधक मानलं नाही. असे असताना , आता जर त्रास देत असतील, तर काही दिवस लक्ष ठेवा असा सल्लाही जरांगे यांनी समाज बांधवांना दिला.

मोदींना सत्तामिळेपर्यंत गरीबांची गरजमराठा समाजाचा डर निर्माण झाल्याने एका मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीन तीन सभा घ्याव्या लागते असे जरांगे म्हणाले. त्यांना सत्ता मिळेपर्यंत गरिबांची गरज असते. मराठा समाज विरोधात गेल्याने आता मोदी इथेच महाराष्ट्रातच आहेत. दलीत, मुस्लिम समाजाला सत्तेत बसवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलAurangabadऔरंगाबादDhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडेbeed-pcबीड