‘त्या’ पाच आरोपींची न्यायालयीन कोठडी

By Admin | Updated: November 17, 2015 00:28 IST2015-11-16T23:48:38+5:302015-11-17T00:28:38+5:30

जालना : व्यापाऱ्यास लुटमार करून त्याचे अपहरण व खंडणी उकळण्याचा कट रचणाऱ्या पाच आरोपीस ९ नोव्हेंबर जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले होते

'Those' five accused in judicial custody | ‘त्या’ पाच आरोपींची न्यायालयीन कोठडी

‘त्या’ पाच आरोपींची न्यायालयीन कोठडी


जालना : व्यापाऱ्यास लुटमार करून त्याचे अपहरण व खंडणी उकळण्याचा कट रचणाऱ्या पाच आरोपीस ९ नोव्हेंबर जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले होते. या पाच गुन्हेगारांच्या सहाव्या साथीदारास गुन्हे शाखेने बीड येथून रविवारी अटक केली.
दरम्यान, त्या पाचही आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली.
जालना येथील नवीन मोढ्यातील आडत व्यापारी आशीष आनंद सेठिया यांच्या जवळील मोठी रक्कम लुटून त्यांचे अपहरण करण्याचा बेत बीड येथील पाच अट्टल गुन्हेगारांनी रचला होता. ते ९ नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास नवीन मोंढा ते भोकरदन नाका रस्त्यावर टाटासुमो वाहनात दबा धरून बसलेल्या या आरोपींना वरकड हॉस्पिटल समोरील मोकळ्या जागेत सापळा लावून जेरबंद करण्यात आले होते. त्यात अन्वर खान मिर्झा खान उर्फ गुजर (३२ रा. इंद्रप्रस्थ कॉलनी बीड), शेख वसीम शेख वजीर (२६ रा. ढगे कॉलनी,अशोकनगर बीड), सय्यद नासेर सय्यद महेबूब (२४ रा.बालेपीर भरतभूषण क्षीरसागर नगर,बीड), सय्यद अहमद सय्यद महेबुब (२५ रा. संजयनगर गॅस गोडावून समोर जालना), व शेख उबेद शेख बाबु (२५ बागल नाक्या जवळ बीड) या पाच जणांना समावेश होता. त्यांच्या ताब्यातून टाटासुमो, एक तलवार, एक चाकु, दोरी असे साहित्य जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान पोलिस कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आणखी दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत संपल्याने या आरोपींना सोमवारी पून्हा न्यायालयात हजर केले असता त्याना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान याप्रकरणी बीड येथून आणखी एका आरोपीस अटक करण्यात आले आहे. अलिम अहेमद जलील अहेमद असे त्याचे नाव आहे. ही कारवाई प्रभारी पोलिस अधिक्षक राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. अनंत कुलकर्णी, सपोनि विनोद इज्जपवार कर्मचारी हरी राठोड, सचिन चौधरी, भालचंद्र गिरी, वैभव कुरेवाड, रामेश्वर बघाटे, हिरामन फलटनकर, सदाशिव राठोड, सॅम्यूअल कांबळे, विलास चेके, समाधान तलंग्रे, विष्णू कोरडे, प्रशांत देशमुख आदींनी पार पाडली. (प्रतिनिधी)

Web Title: 'Those' five accused in judicial custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.