‘त्या’ बोगस विहिरींची विस्तार अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरु
By Admin | Updated: January 9, 2015 00:49 IST2015-01-09T00:23:48+5:302015-01-09T00:49:40+5:30
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील दैठणा येथील ११ पैकी ९ विहिरींचे काम बोगस निघाल्याची तक्रार करण्यात आल्याने तसेच त्या संबंधी वृत्त प्रकाशित झाल्याने या कामांची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे

‘त्या’ बोगस विहिरींची विस्तार अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरु
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील दैठणा येथील ११ पैकी ९ विहिरींचे काम बोगस निघाल्याची तक्रार करण्यात आल्याने तसेच त्या संबंधी वृत्त प्रकाशित झाल्याने या कामांची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. सर्व कामांची चौकशी विस्तार अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी आर. एल जाधव यांची चौकशी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली असल्याची माहिती पं.स.चे गटविकास अधिकारी सुधीर ठोंबरे यांनी लोकमतशी बोलतांना दिली.
दैठणा येथे मनरेगाच्या माध्यमातून ११ विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी केवळ दोनच विहिरींची कामे पूर्ण झाले. ९ विहिरींचे काम बोंगस करण्यात आले. काम न करताच ८ लाख २० हजार २७१ बिल उचलण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या अनुषंगाने या कामांची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच आदेश संबधितांना देण्यात आले आहेत. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान प्रशासकीय बाबींची चौकशी करणार आहोत. तर तांत्रिक बाबींची चौकशी कनिष्ठ अभियंत्यांमार्फत करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. (वार्ताहर)