शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

यंदाही औरंगाबादकरांचा उन्हाळा त्रासदायक, ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकायला जागाच नाही

By मुजीब देवणीकर | Updated: February 1, 2023 15:22 IST

जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंतचे विदारक चित्र

औरंगाबाद : दरवर्षी उन्हाळ्यात औरंगाबादकरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ९०० मिमी व्यासाची आणखी एक जलवाहिनी टाकण्याचा निर्णय मार्च २०२२ मध्ये घेण्यात आला. वर्ष उलटत आले तरी या कामाचा अद्याप श्रीगणेशाच झाला नाही. आता काम सुरू करायचे म्हटले तर जलवाहिनी टाकण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याची बाब समोर आली. यंदाही औरंगाबादकरांना पाणीटंचाईचा मुकाबला करावाच लागणार आहे.

शहराची तहान भागविण्यासाठी १९७५ मध्ये पहिल्यांदा जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकली. नंतर १९९२ मध्ये १४०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकली. या दोन्ही जलवाहिन्यांद्वारे १२० एमएलडी पाणी दररोज शहरात येते. शहराची तहान भागविण्यासाठी किमान २०० एमएलडी पाण्याची गरज आहे. कायमस्वरूपी शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी २७४० कोटी रुपयांच्या योजनेअंतर्गंत तब्बल २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे कामही सुरू आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी आणखी एक ते दीड वर्ष लागणार आहे. तेव्हापर्यंत शहराची तहान भागविण्यासाठी आणखी एक ९०० मिमी व्यासाची योजना टाकण्याची संकल्पना काही अधिकाऱ्यांच्या सुपीक डोक्यातून आली. शासनानेही १९३ कोटींच्या या योजनेला मान्यता दिली. अमृत-२ मध्ये या योजनेला मंजुरी घेतली. मंजुरीच्या अधीन राहून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चार टप्प्यांत निविदा प्रक्रिया राबविली. शिक्षक मतदारसंघाची निवडणूक संपताच कामाला सुरुवात होणार आहे.

आता जागेचा शोध सुरू७०० मिमी व्यासाच्या बाजूलाच १४०० मिमीची जलवाहिनी आहे. आणखी थोड्या बाजूला २५०० मिमीची सर्वांत मोठी जलवाहिनी टाकण्यात येत आहे. आता ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी कुठे टाकावी, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी तर जागाच शिल्लक नाही. जिथे जागा उपलब्ध आहे, तेथे तारेवरची कसरत करीत जलवाहिनी टाकावी लागेल. जुन्या दोन्ही जलवाहिन्या तीन ठिकाणी ‘क्राॅस’ झालेल्या असल्यामुळे ९०० मिमीची जलवाहिनी टाकताना जमिनीची अडचण निर्माण होणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी