शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

यंदा मराठवाड्यातून सुमारे ५० हजार मेट्रिक टन केशर आंबा युरोप, अमेरिकेत निर्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 18:00 IST

मराठवाड्यातील केशर आंब्याला जगभरातून मागणी असते.

छत्रपती संभाजीनगर : कोकणातील हापूस आणि मराठवाड्यातील केशर आंब्याची चव विदेशी नागरिकांना चांगलीच भावली आहे. राज्यभरातील ९ हजार ४५९ आंबा बागांची या वर्षी कृषी विभागाकडे नोंदणी झाली आहे. यात मराठवाड्यातील सुमारे १५०० आमरायांचा समावेश असून त्यातून ४५ ते ५० हजार मेट्रिक टन केशर आंब्याची युरोपियन युनियन आणि अमेरिकाला निर्यात होण्याचा अंदाज आहे.

निर्यातक्षम आंबा बागांची नोंद करण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला. दरवर्षी महाराष्ट्रातून युरोपियन युनियन आणि अन्य देशांना आंब्यांची निर्यात होते. या निर्यातीसाठी अपेडाच्या मँगोनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. डिसेंबर २०२४ पर्यंत राज्यातील ९ हजार ४५९ निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झालेली आहे.

मराठवाड्यातील केशर आंब्याला जगभरातून मागणी असते. गतवर्षी मात्र अपुऱ्या पावसामुळे केशर आंब्याचे उत्पादन घटल्याने स्थानिक बाजारातच केशर आंब्याला चांगला दर मिळत होता. यामुळे आंबा बागायतदारांनीही आंबा निर्यात करण्याऐवजी स्थानिक बाजारातच विक्री करण्यास प्राधान्य दिले होते. परिणामी, गतवर्षी मराठवाड्यातून केवळ ३० हजार मेट्रिक टन केशर आंब्याची निर्यात झाली होती. यंदा मात्र हवामान चांगले असल्याने आंब्याचे उत्पादनही वाढण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर आगामी हंगामात सुमारे ४५ हजार ते ५० हजार मेट्रिक टन आंब्याची निर्यात होण्याचा अंदाज महाकेशर आंबा बागायतदार संघाचे उपाध्यक्ष डॉ. भगवानराव कापसे यांनी वर्तविला आहे.

२८ फेब्रुवारीपर्यंत करा आंबा बागांची नोंदणीनिर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी ऑनलाइन करणे बंधनकारक केले आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या बागांची नोंदणी करता येणार आहे. बागायतदारांनी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक आणि कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून मँगोनेटद्वारे त्वरित अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांनी केले.

नोंदणीसाठी या कागदपत्रांची आवश्यकताप्रथम नोंदणी व नूतनीकरणासाठी विहित नमुन्यातील अर्ज, सातबारा, नमुना आठ अ, बागेचा नकाशा आणि आधार कार्ड आदी कागदपत्रांची आवश्यकता असल्याचे कृषी अधीक्षक देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाMangoआंबाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरFarmerशेतकरी