तीसगावात लक्ष्मीमाता यात्रेची सांगता

By Admin | Updated: April 16, 2016 01:47 IST2016-04-16T01:03:40+5:302016-04-16T01:47:19+5:30

वाळूज महानगर : तीसगाव येथील लक्ष्मीमाता यात्रेची उत्साहात सांगता करण्यात आली. या यात्रेत दोन दिवस भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

In the third place Lakshmimata Yatra tells | तीसगावात लक्ष्मीमाता यात्रेची सांगता

तीसगावात लक्ष्मीमाता यात्रेची सांगता


वाळूज महानगर : तीसगाव येथील लक्ष्मीमाता यात्रेची उत्साहात सांगता करण्यात आली. या यात्रेत दोन दिवस भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेच्या शेवटच्या दिवशी जिल्हाभरातून आलेल्या मल्लांनी कुस्त्यांचा फड गाजविला होता.
गावाचे आराध्यदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मीमातेच्या यात्रेनिमित्त गावात दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. भाविक-भक्ताच्या नवसाला पावणारी अशी ख्याती लक्ष्मीमातेची असल्यामुळे परजिल्ह्यांतून भाविक मोठ्या संख्येने यात्रेला येत असतात. या लक्ष्मीमातेच्या यात्रेप्रसंगी पहिल्या दिवशी शेकडो भाविक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सायंकाळी संदल व मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत आबालवृद्धासह भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी बारा बैलगाड्या ओढण्याचा कार्यक्रमही घेण्यात आला. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १२ एप्रिल रोजी १२ गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो. यावेळी आयोजित कुस्त्यांच्या दंगलीमध्ये जिल्हाभरातून जवळपास २०० मल्लांनी सहभाग नोंदविला होता.
या कुस्ती स्पर्धेत ५ रुपयांपासून अडीच हजारांपर्यंच्या कुस्त्या खेळविण्यात आल्या. यावेळी पंच म्हणून कडुबा चोपडे, रामचंद्र कसुरे, संजय जाधव, रायभान शेलार, कन्हैयालाल सूर्यवंशी आदींनी काम पाहिले. यात्रा यशस्वी करण्यासाठी महोत्सव समितीचे दिगंबर कसुरे, रुस्तुम भालेराव, विठ्ठल चोपडे, कारभारी पुऱ्हे, रामा तरैय्यावाले, पाशू शेख, रामचंद्र गायकवाड, राजेश कसुरे, पंढरीनाथ साळे, पुंडलिक जाधव, रावसाहेब दाभाडे, हंसराज सूर्यवंशी, माजी जि. प. सदस्य रामचंद्र कसुरे, संजय जाधव आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Web Title: In the third place Lakshmimata Yatra tells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.