गारपीट मदतीचा तिसरा टप्पा खात्यावर जमा

By Admin | Updated: May 29, 2014 00:32 IST2014-05-29T00:04:44+5:302014-05-29T00:32:36+5:30

रमेश शिंदे , औसा गेल्या तीन महिन्यांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गारपीटग्रस्त भागांतील नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना शासनाने नुकसानभरपाई दिली.

The third phase of hailstorm relief was deposited on the account | गारपीट मदतीचा तिसरा टप्पा खात्यावर जमा

गारपीट मदतीचा तिसरा टप्पा खात्यावर जमा

 रमेश शिंदे , औसा गेल्या तीन महिन्यांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गारपीटग्रस्त भागांतील नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना शासनाने नुकसानभरपाई दिली. पहिल्या टप्प्यात तालुक्यातील ६७ गावांतील ३० हजार शेतकर्‍यांना १३ कोटी ३० लाख ७० हजार ४५० रुपयांचे वाटप करण्यात आले. तर दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यामध्ये ५८ गावांतील २७ हजार ५०५ शेतकर्‍यांना नुकसानभरपाई पोटी १२ कोटी ७ लाख ६७ हजार एवढी रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली. औसा तालुक्यातील दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यातील शेतकर्‍यांना ऐन पेरणीच्या कालावधीत नुकसानभरपाई मिळणार आहे. यामध्ये किल्लारी-११२४ शेतकर्‍यांना ८३६१५००, किल्लारीवाडी-३०४ शेतकर्‍यांना २२४४४३८, किनीथोट- २५४ शेतकर्‍यांना १०,४७६५०, कुमठा-२०९ शेतकर्‍यांना ८८४०५०, लखनगाव-३२१ शेतकर्‍यांना २१९०९५०, लामजना-१५५२ शेतकर्‍यांना ८०५५६४५०, लिंबाळा-६८१ शेतकर्‍यांना २६६६५५०, लोदगा-३८९ शेतकर्‍यांना २७९९९००, लोहटा-११२ शेतकर्‍यांना २९१०००, माळकोंडजी-५९८ शेतकर्‍यांना १८७६०००, माळुंब्रा-३२६ शेतकर्‍यांना ९६२१५०, मंगरुळ-३९८ शेतकर्‍यांना २८,६०२००, मसलगा (बु.)- ३० शेतकर्‍यांना ६९८५०, मसलगा (खु.)- २१७ शेतकर्‍यांना ५०८३५०, मासुर्डी- ६७२ शेतकर्‍यांना २२,८७८००, मातोळा- १०८१ शेतकर्‍यांना ३७,३९५००, मोगरगा येथील ५५२ शेतकर्‍यांना ३१६९५५०, मुगळेवाडी येथील १११ शेतकर्‍यांना ३२९०००, महादेववाडी येथील ९७ शेतकर्‍यांना ८३११००, नागरसोगा-१२३५ शेतकर्‍यांना ३७३३६००, नाव्होली-२३५ शेतकर्‍यांना ९,२२८५०, नांदुर्गा-१११९ शेतकर्‍यांना ३८,०२६००, पारधेवाडी-८०९२ शेतकर्‍यांना ८७९१००, पिरमगजवाडी-६३ शेतकर्‍यांना ९०४५००, रामेगाव-६५४ शेतकर्‍यांना २९८१०००, राजेवाडी येथील १४४ शेतकर्‍यांना ८४२५००, रामवाडी-९७ शेतकर्‍यांना ६७५०००, समदर्गा-३३६ शेतकर्‍यांना ९६८३५५०, संक्राळ-२४६ शेतकर्‍यांना ९६१०८००, सारणी-२७४ शेतकर्‍यांना ८२६५००, सारोळा येथील १०६२ शेतकर्‍यांना ५३५३१००, सत्तरधरवाडी-३४० शेतकर्‍यांना १६८८०००, सेलू-१०६८ शेतकर्‍यांना ५४८०६००, सिंदाळा (ज.) येथील ८८ शेतकर्‍यांना ४६५०००, शिवणी (बु.)-५९१ शेतकर्‍यांना ३१२९५००, सिंदाळा (ल.) येथील ६०९ शेतकर्‍यांना १९००५५०, सिंदाळावाडी येथील ३५० शेतकर्‍यांना ६९११५०, शिवली येथील १०३५ शेतकर्‍यांना ३२०३५५०, सिरसल येथील ५८२ शेतकर्‍यांना २६७४३५०, शिवणी (लख) येथील ५१५ शेतकर्‍यांना २४६७९००. तुंगी (बु.) येथील १०३९ शेतकर्‍यांना २६७९५००, तुंगी (खु.) येथील १४२ शेतकर्‍यांना १००९४५०, टाका येथील ६०७ शेतकर्‍यांना १८७६६००, तळणी येथील १०१६ शेतकर्‍यांना ५०३०६००, तोंडवळी-१२२ शेतकर्‍यांना ६२५७००, तावशीताड येथील ३७२ शेतकर्‍यांना १२७९५५०, तांबरवाडी येथील १८१ शेतकर्‍यांना ६१४७५०, उजनी येथील १३७८ शेतकर्‍यांना ४८४८२५०, उटी खु. येथील १७६ शेतकर्‍यांना ९८६०५०, उंबडगा (खु.) येथील ११४ शेतकर्‍यांना ९६८०००, उंबडगा (बु.) येथील १७१ शेतकर्‍यांना १३९९२५०, उतका येथील ६१७ शेतकर्‍यांना २४७००००, वाघोली-३८८ शेतकर्‍यांना १४१३५००, वांगजेवाडी येथील १८८ शेतकर्‍यांना ७६३५००, वांगजी येथील ४४८ शेतकर्‍यांना १२५६०००, वरवडा येथील ३८९ शेतकर्‍यांना १३२८९५०, वडजी येथील ३७४ शेतकर्‍यांना २११६०५०, यल्लोरीवाडी येथील ६० शेतकर्‍यांना २१६२५०. अशा एकूण दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यातील ५८ गावांतील २७ हजार ५०५ शेतकर्‍यांना १२ कोटी ७ लाख ६७ हजार ९३८ रुपये मिळाले आहेत. उर्वरित गावांना पुढच्या टप्प्यात अनुदान औसा तालुक्यातील जवळपास सर्वच गावांना गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान मिळाले आहे. गारपीट झाल्यानंतर तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक या तिघांच्या संयुक्त पथकाने पंचनामे केले होते. पहिल्या टप्प्यात ६७ गावांतील ३० हजार शेतकर्‍यांना १३ कोटी ३० लाख ७० हजार ४५० रुपये मिळाले होते. यामधील बहुतांश शेतकर्‍यांनी हे पैसे उचलले आहेत. तर आता दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यात २७ हजार ५०५ शेतकर्‍यांना १२ कोटी ७ लाख ६७ हजार ९३८ रु. मिळाले. सदरील अनुदान महसूल प्रशासनाने बँकेकडे वर्ग केले आहेत. आता लवकरच हे पैसे शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. तालुक्यातील १२५ गावांतील शेतकर्‍यांना पैसे मिळाले असले तरी अल्फाबेटिकल पद्धतीने गावनिहाय पैशांचे वाटप करण्यात आले. उर्वरित ५ गावांना मात्र पुढच्या टप्प्याची वाट पहावी लागणार आहे. याबाबत तहसीलदार दत्ता भारस्कर यांच्याशी संपर्क साधला असता उर्वरित गावांनाही पुढच्या टप्प्यात अनुदान मिळणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले.

Web Title: The third phase of hailstorm relief was deposited on the account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.