बकवास करण्याआधी विचार करा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:02 IST2021-03-06T04:02:06+5:302021-03-06T04:02:06+5:30
अभिनेत्री परिणीती चोप्राचा ‘सायना’ या सिनेमाचे पोस्टर रिलीज झाले आणि काही ट्रोलर्स यांनी यावरून तिची जबरदस्त खिल्ली उडवली. चित्रपटाचे ...

बकवास करण्याआधी विचार करा...!
अभिनेत्री परिणीती चोप्राचा ‘सायना’ या सिनेमाचे पोस्टर रिलीज झाले आणि काही ट्रोलर्स यांनी यावरून तिची जबरदस्त खिल्ली उडवली. चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी या ट्रोलिंगवर संताप व्यक्त करून एक पोस्ट लिहिली आहे. ‘पोस्टरवर डिजिटल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. टेनिसची सर्व्हिस वाटतेय, सायना सानिया बनलीये वगैरे वगैरे... राहुल नंदाच्या एवढ्या कल्पक पोस्टरबाबत उलटसुलट प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. मला त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागणे, हे दुर्दैवी आहे. बकवास करण्याच्या आधी विचारच करत नाहीत. विचार करा,’ असे गुप्ते यांनी ट्रोलर्सला फटकारले आहे.
नुसरत भरुचाचे फोटो पाहून चाहते दंग
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते. अलीकडेच नुसरत भरुचा हनी सिंगसोबत ‘सैंया’ म्युझिक सिंगलमध्ये दिसली होती. यातील तिच्या अदांवर चाहते फिदा झाले होते. आता तिने एक फोटोशूट सोशल मीडियात शेअर केले आहे. अल्पावधीत हे फोटो खूप व्हायरल झाले आहेत. यात नुसरतने बॅकलेस ड्रेस घातला आहे. तसेच तिने या फोटोशूटमध्ये स्टायलिश पोज दिल्या आहेत. या फोटोंवर तिच्या अनेक चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
ही ग्लॅमरस अभिनेत्री आहे सुश्मिता सेनची वहिनी
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री चारू असोपाने ही बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन हिची वहिनी आहे. तिने ‘अगले जन्म मोहे बिटिया ही कीजो’ या मालिकेद्वारे करिअरला सुरुवात केली. मात्र, तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ‘मेरे अगने में’ या मालिकेमुळे मिळाली. चारू तिच्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. आता तिने असेच एक बोल्ड फोटोशूट शेअर केले आहे. यात ती बाथटबमध्ये असून ती खूप आकर्षक दिसत आहे. या ग्लॅमरस फोटोशूटची सुद्धा चाहत्यांनी प्रशंसा केली आहे.