शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘मोशन डिटेक्टर सीसीटीव्ही’मुळे चोरांचे पलायन; काय आहे चोरी टाळणारे अद्ययावत तंत्रज्ञान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 11:55 IST

घर मालकाला मोबाइलवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे घरासमोर हालचाली आढळल्याचा अलर्ट आला.

छत्रपती संभाजीनगर : एका हॉटेल व्यावसायिकाच्या बंगल्यात दोन चोरांनी चोरीचा कट रचला. मंगळवारी रात्री तयारीनिशी त्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. मात्र, व्यावसायिकाने घरात बसवलेल्या अद्ययावत कॅमेऱ्यामुळे त्यांचा प्रवेश झाल्याचे क्षणात उघड झाले आणि रहिवाशांची गर्दी जमत असल्याचे लक्षात येताच चोरांना आल्यामार्गे रिकाम्या हाताने पळावे लागले.

मनीष धारसीभाई परमार (रा. एन ३, सिडको) हे हॉटेल व्यावसायिक आहेत. २९ एप्रिल रोजी ते कुटुंबासह कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. सुरक्षेचा उपाययोजना म्हणून त्यांनी घरासमाेर मोशन डिटेक्टर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. ते गावाला गेले त्याच रात्री ९ वाजता परमार यांच्या मोबाइलवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे घरासमोर हालचाली आढळल्याचा अलर्ट आला. त्यांनी तपासल्यावर त्यांना घराच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून दोन चोरटे आत घुसल्याचे दिसले. परमार मोबाइलवर पाहत असतानाच ते कुलूप तोडण्याच्या प्रयत्नात होते. परमार यांनी शेजारी माजी नगरसेवक प्रमोद राठोड यांना फोन केला. राठोड यांच्यासह अन्य रहिवाशांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. रहिवासी येत असल्याचे लक्षात आल्याने चोरांनी साहित्य टाकून धूम ठोकली. पुंडलिकनगरचे सहायक फौजदार सुनील मस्के तपास करीत आहेत.

काय आहे मोशन डिटेक्टर सीसीटीव्ही?-मोशन डिटेक्टर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कुठलीही हालचाल होताच रेकॉर्डिंग सुरू करुन वापरकर्त्याला मोबाइलवर संदेश जातो. फक्त हालचालींचे रेकॉर्डिंग केल्यामुळे अनावश्यक व्हिडीओ टाळून स्टोरेजची बचत होते. नाइट व्हिजनमुळे अंधारातही हालचाल दिसते.-अद्ययावत मोशन डिटेक्टर कॅमेऱ्यात एआयचा वापर आल्याने मनुष्य, प्राण्यांमधला फरक ओळखतो. शिवाय, अन्य कॅमेऱ्यात उंचीवरूनही ‘सेटिंग’ बदलता येते.-या सेटिंग्ज, सिग्नल जनरेशन व्यवस्थित सेट केल्यानंतर मोबाइलवर योग्य ‘अलर्ट’ मिळतो. अशा अद्ययावत तंत्रज्ञानाचा अन्य नागरिकांनीदेखील अवलंब करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर