चोरट्यांनी सीसीटीव्ही फुटेजबॉक्सच लांबविला

By Admin | Updated: January 9, 2015 00:49 IST2015-01-09T00:26:09+5:302015-01-09T00:49:25+5:30

जालना : शहरातील एक इलेक्ट्रीकल दुकान चोरट्यांनी आठ महिन्यात दुसऱ्यांदा फोडले.

The thieves did not extend the CCTV footage box | चोरट्यांनी सीसीटीव्ही फुटेजबॉक्सच लांबविला

चोरट्यांनी सीसीटीव्ही फुटेजबॉक्सच लांबविला


जालना : शहरातील एक इलेक्ट्रीकल दुकान चोरट्यांनी आठ महिन्यात दुसऱ्यांदा फोडले. पहिल्या चोरीत पाच लाखाचा मुद्देमाल चोरणाऱ्या चोरट्यांनी यावेळेस दुकानातील चक्क सीसीटीव्हीचे फुटेज असलेला बॉक्सच चोरून नेला.
शहरातील व्यापारी अलोक नानावटी यांची महात्मा गांधी मार्गावर मॅजेस्टीक टॉकीजलगत अभय एजन्सी आहे. बुधवारी रात्री ९ वाजता दुकान बंद करून नानावटी घरी गेल्यानंतर चोरट्यांनी दुकानाचे पाठीमागील शटर व चॅनलगेट तोडून आत प्रवेश केला. त्यांनी दुकानातील गल्ला फोडला. त्यात सात हजार रूपये काढून घेतले. दुकानातील इतर महागड्या एकाही वस्तुला हात न लावता सीसीटीव्ही केमेऱ्याच्या सर्व वायरींग तोडून कॅमेऱ्याचे फुटेज असलेला बॉक्सच चोरून नेला. यापूर्वी २ मे २०१४ रोजी अशाच पद्धतीने हे दुकान फोडण्यात आले होते. त्यावेळी चोरट्यांनी रोख रक्कमेसह साडेचार लाखाचा ऐवज चोरून नेला होता. या चोरीचा तपास अद्याप लागलेला नसताना बुधवारी रात्री पुन्हा चोरट्यांनी दुकान फोडून पोलिसांसमोर आव्हान उभे केले. (वार्ताहर)

Web Title: The thieves did not extend the CCTV footage box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.