चोरट्यांनी टायरचे गोडाऊन फोडले
By Admin | Updated: August 28, 2014 00:22 IST2014-08-28T00:19:49+5:302014-08-28T00:22:37+5:30
वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, चोरट्यांनी साजापूर शिवारातील गोडाऊनचे शटर उचकटून पावणेदोन लाख रुपये किमतीचे टायर लांबविले.

चोरट्यांनी टायरचे गोडाऊन फोडले
वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, चोरट्यांनी साजापूर शिवारातील गोडाऊनचे शटर उचकटून पावणेदोन लाख रुपये किमतीचे टायर लांबविले.
वडगाव रोडवर गट नंबर ५१ मध्ये बिर्ला कंपनीचे टायरचे गोदाम आहे. या गोडाऊनमध्ये ट्रक व टेम्पोसाठी लागणारे टायर साठवून ठेवण्यात येतात. २३ आॅगस्टला या गोडाऊनचे अधिकारी संतोष मदनलाल पांडे (५०, रा. एन-३ सिडको, औरंगाबाद) हे गोडाऊन बंद करून घरी गेले होते. रात्री चोरट्यांनी या गोडाऊनचे शटर उचकटून ट्रकसाठी लागणारे १ लाख ७७ हजार रुपये किमतीचे १२ टायर चोरून नेले.
२५ आॅगस्टला संतोष पांडे हे गोडाऊनमध्ये आले असता त्यांना १२ टायर गायब असल्याचे दिसून आले. पांडे यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ. आव्हाड हे करीत आहेत.