बजाजनगरात चोरट्यांनी गोदाम फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 22:50 IST2019-08-25T22:50:21+5:302019-08-25T22:50:31+5:30
गोदामाचे शटर उचकटून जवळपास २१ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

बजाजनगरात चोरट्यांनी गोदाम फोडले
वाळूज महानगर : बजाजनगरातील बॅटरी व इर्न्व्हटरच्या गोदामाचे शटर उचकटून जवळपास २१ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमधून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
प्रशांत भगवानदास दौलताबादकर यांचे बजाजनगरात जैन स्थानक मंदिरासमोर बॅटरी व इर्न्व्हटरचे गोदाम आहे. यामध्ये सय्यद गुफरान व शाकेर शेख हे कामगार आहेत. शनिवारी रात्री ८:३० वाजता गोदाम बंद करुन दोन्ही कामगार घरी गेले.
दरम्यान, चोरट्यानी गोदामाचे शटर उचकटून आतील बॅटऱ्या व इर्न्व्हटर चोरुन नेले. तसेच सीसीटीव्ही दिसताच आपण सापडू नये म्हणून संगणक, सीपोओ व राऊटरही घेवून गेले.
रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दौलताबादकर त्यांनी घटनेची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात सांयकाळपर्यंत गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले.