चोरट्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:06 IST2021-02-09T04:06:41+5:302021-02-09T04:06:41+5:30

औरंगाबाद : घराच्या भिंतीवर चढून किचनमध्ये ठेवलेल्या पर्समधील सोन्याचे दागिने, मोबाइल आणि रोख रक्‍कम असा सुमारे ३९ हजार रुपये ...

The thief was remanded in police custody for two days | चोरट्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी

चोरट्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी

औरंगाबाद : घराच्या भिंतीवर चढून किचनमध्ये ठेवलेल्या पर्समधील सोन्याचे दागिने, मोबाइल आणि रोख रक्‍कम असा सुमारे ३९ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरणारा शेख गफ्फार उर्फ बबलू शेख सत्तार (३२, रा. चमचमनगर, नारेगाव) या सराईत चोरट्यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.शेख मुस्ताक शेख उमर (रा. आवेश कॉलनी, नारेगाव) यांच्या नातवाचा दि. ६ फेब्रुवारी रोजी नामकरण विधि होता. या कार्यक्रमासाठी त्यांचे साडू शेख युसूफ व त्यांचे कुटुंब आले होते. रात्री सर्वजण जेवण करून झोपी गेले असता चोरट्याने घराच्या भिंतीवरून घरात प्रवेश करून किचनमध्ये झोपलेल्या मुस्ताक यांच्या मुलीच्या उशाजवळ ठेवलेल्या पर्समधील सोन्याचे नेकलेस, रोख रक्‍कम आणि दोन मोबाइल, असा ऐवज चोरून नेला. सकाळी उठल्यावर घरात चोरी झाल्याची बाब उघडकीस आली. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रविवारी सापळा रचून आरोपी शेख गफ्फार उर्फ बबलू याला अटक केली. त्याच्या ताब्यातून चोरीचे दोन मोबाइल आणि सोन्याचे नेकलेस जप्‍त करण्यात आले. त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी सहायक सरकारी वकील एन. ए. ताडेवाड यांनी काम पाहिले.

Web Title: The thief was remanded in police custody for two days