शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे, चालू महिन्याचे वेतन गणेशोत्सवापूर्वी देणार; १४ हजार शिक्षक-कर्मचाऱ्यांचे जुलैचेच वेतन थकले

By राम शिनगारे | Updated: August 25, 2025 20:11 IST

९७५ आश्रमशाळांमधील स्थिती

छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाने गणेशोत्सवामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन २६ ऑगस्टपूर्वी करण्याचे आदेश दिले. त्याच वेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत (ओबीसी मंत्रालय) विमुक्त जाती, भटक्या जमाती विद्यार्थ्यांसाठीच्या आश्रमशाळातील शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जुलैचेच वेतन अदा केले नसल्याची धक्कादायक माहिती आहे. राज्यातील ९७५ आश्रमशाळांमधील तब्बल १४ हजारांवर कर्मचारी जुलैच्या वेतनापासून वंचित असल्याचा दावा प्रहार शिक्षक संघटनेने केला आहे.

राज्य शासनाने चालू महिन्याचे वेतन १ सप्टेंबरला करण्याऐवजी गणेशोत्सवामुळे २६ ऑगस्ट रोजी करण्याचे आदेश २१ ऑगस्ट रोजी दिले. त्यानुसार प्रत्येक विभागाकडून तयारी सुरू आहे. ओबीसी विभागाच्या अंतर्गत राज्यात ९७५ आश्रमशाळा कार्यरत आहेत. या शाळांमध्ये जवळपास १४ हजार शिक्षक व कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी प्रत्येक महिन्याला १०५ कोटी रुपयांचा निधी लागतो. हा निधी उपलब्ध होण्यासाठी ओबीसी विभागाच्या संचालक कार्यालयाकडून ५ ऑगस्ट रोजीच मागणी प्रधान सचिवांना करण्यात आलेली आहे. त्याशिवाय ऑगस्ट महिन्यासाठीचीही मागणी केली आहे. जुलै महिन्यासाठी १०५ कोटींतील केवळ ४६ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. उर्वरित निधी उपलब्ध झालेला नसल्यामुळे आश्रमशाळांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्यातील पगार अद्यापपर्यंत झालेले नाहीत. ऑगस्टसाठी केव्हा निधी मिळेल, असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला.

निधी उपलब्ध होताच पगारसंचालक कार्यालयाकडून निधीची मागणी केलेली आहे. आश्रमशाळातील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे जुलै व ऑगस्टचे वेतन निधी उपलब्ध होताच करण्यात येईल. त्यासाठी संचालक कार्यालयाकडून पाठपुरावाही करण्यात येत आहे.- सोनाली मुळे, संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, पुणे

हा नेहमीचाच त्रासशासनाने गणेशोत्सवासाठी २६ ऑगस्टपर्यंत वेतन करण्याचे आदेश दिले आहेत. आश्रमशाळातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुलैचेच वेतन मिळालेले नाही, तर ऑगस्टचे कसे मिळेल? मागील वर्षी समाज कल्याण विभागातून इतर बहुजन कल्याण विभाग स्वतंत्र झाल्यापासून प्रत्येक महिन्यालाच ही समस्या आहे. शासनाने कायमस्वरूपी तोडगा काढावा.- विजय धनेश्वर, राज्य समन्वयक, प्रहार शिक्षक संघटना.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरTeacherशिक्षक