शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ सात गावांची केली दिशाभूल

By admin | Updated: July 27, 2014 01:16 IST

सुनील चौरे, हदगाव तालुक्यातील त्या सात गावांसाठी आठवड्यातून दोन दिवसांसाठी महसूल मंडळ देण्याचे मान्य केले असून या ठिकाणी नायब तहसीलदार थांबणार आहेत.

सुनील चौरे, हदगावतालुक्यातील त्या सात गावांसाठी आठवड्यातून दोन दिवसांसाठी महसूल मंडळ देण्याचे मान्य केले असून या ठिकाणी नायब तहसीलदार थांबणार आहेत. परंतु ही सात गावे अर्धापूर तालुक्यात समाविष्ट करण्याच्या मागणीची शासनाकडून दिशाभूल करण्यात आल्याच्या प्रतिक्रिया सात गावांतील ग्रामस्थांतून उमटत आहेत.हदगाव तालुक्यातील अर्धापूरलगत असलेली निमगाव, रोडगी, चोरंबा, चाभरा, सोनाळा, खैरगाव व चाभरातांडा ही सात गावे अर्धापूर तालुक्याला जोडण्यासंदर्भात गत १५ वर्षांपासून मागणी सुरु आहे. या गावांसाठी हदगाव हे तालुक्याचे ठिकाण ४५ ते ५० किमी तर अर्धापूर ५ ते ७ किमी अंतरावर आहे. तहसील, पं. स. महसूल, कृषी तसेच इतर सर्वच कामांसाठी येथील ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. यामुळे वेळ व पैसा खर्च करुनही वेळेवर कामे होत नाहीत. याचा परिणाम विकासाच्या कोणत्याही योजना या गावापर्यंत पोहोचत नसल्याने सदर गावे विकासापासून कोसोदूर राहिली आहेत. तालुका बदलीच्या मागणीसाठी सात गावच्या शिष्टमंडळाने वेळोवेळी लोकप्रतिनिधी, प्रशासन यांची भेट घेवून अडचणी सांगितल्या, परंतु त्यांच्या समस्या कोणीही ऐकायला तयार नाही. यानंतर ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेवून वेळोवेळी आंदोलने करुन प्रशासनापुढे महसूल अर्धापूर तालुक्याला जोडण्यासंदर्भात मागणी लावून धरली. यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच पालकमंत्री डी.पी.सावंत यांची भेट घेवून अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.यानंतर महसूलमंत्र्यांनी मुंबई येथे शिष्टमंडळाची बैठक बोलावून सदर सात गावांचे महसूल मंडळ अर्धापूरला जोडण्याचे अश्वासन दिले होते, मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर तालुका समावेशाची प्रक्रिया पूर्ण होईल, असे सांगितले होते. परंतु या गावांचा तालुका बदलायचा सोडाच तर महसूल मंडळही अर्धापूर तालुक्याला जोडले नाही. २६ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी हदगाव येथे घेतलेल्या आढावा बैठकीत सात गावांचा महसूल विभाग अर्धापूरला जोडणे शक्य नाही, त्यावर उपाय म्हणून नायब तहसीलदार दर्जाचा अधिकारी आठवड्यातील सोमवार व बुधवार असे दोन दिवस चाभरा व निमगाव येथे दिवसभर कर्तव्य बजावतील, अशी व्यवस्था केली आहे. यावेळी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सात गावांच्या कामकाजासाठी ्आठवड्यातून दोन दिवस नायब तहसीलदारांसह महसूल, पोलिस विभाग, पंचायत समिती, कृषीसह इतर विभागाचेही कर्मचारी थांबून जनतेची कामे करतील. - संतोष गोरड, तहसीलदार हदगाव