शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

'त्यांनी' पैसे खाऊन 'आदर्श' पतसंस्थेचा घोटाळा होऊ दिला; ठेवीदारांचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 12:43 IST

सहा तासांच्या थाळीनाद आंदोलनाने उपनिबंधक कार्यालयासह पोलिस आयुक्तालय दणाणले

छत्रपती संभाजीनगर : सहकार खात्याच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचा घोटाळा होऊ दिला. गेल्या आठ वर्षांमध्ये कलम ८९ नुसार तीन वर्षांनी चौकशी का झाली नाही, पतसंस्थेच्या विनापरवाना २८ शाखा कशा सुरू होत्या, असे प्रश्न विचारत शेकडो ठेवीदारांनी सोमवारी थाळीनाद आंदोलन केले. खा. इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली उपनिबंधक कार्यालयासमोर अडीच तास आंदोलन झाल्यानंतर पोलिस आयुक्तालयावर देखील मोर्चा वळवून तेथे पोलिस अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.

जुलै महिन्यात पतसंस्थेच्या २०२ कोटींचा घोटाळा उघडकीस आला. शेकडो ठेवीदारांच्या ठेवी पतसंस्थेत अडकल्या. परंतु काही मुख्य आराेपी अद्यापही पसार असून तीन लेखापरीक्षकांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला. परंतु उपनिबंधक विभागाचे अधिकारी या घोटाळ्यातून नामानिराळे राहिले. याविरोधात सोमवारी आंदोलन छेडण्यात आले. सकाळी अकरा वाजेपासून पुष्पनगरीच्या कार्यालयासमोर हातात ताट आणि चमचा घेऊन ठेवीदारांची गर्दी होण्यास सुरुवात झाली. क्रांती चौक, वेदांतनगर पोलिसांसह दंगल नियंत्रण पथकाचे कर्मचारी तैनात होते. संतप्त ठेवीदारांकडून कार्यालयाच्या दिशेने प्रश्नांची सरबत्ती सुरू होती. यावेळी उपनिबंधक विभागाचे अधिकारी, कर्मचारी कार्यालयातच होते. दुपारी बारा वाजता खा. इम्तियाज मोर्चात सहभागी झाले. तीन वाजता त्यांनी पायी पोलिस आयुक्तालयाकडे मोर्चा वळवला. तेथे सहायक आयुक्त धनंजय पाटील यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेत पारदर्शक कारवाईचे आश्वासन दिले.

अधाने, सुनील सापडत कसे नाहीत?अट्टल गुन्हेगारांना पकडणाऱ्या पोलिसांना अद्यापही घोटाळ्यातील मुख्य आरोपी देवीदास अधाने, सुनील मानकापे सापडले नसल्याने ठेवीदारांनी संताप व्यक्त केला. आता एसआयटीवर विश्वास उरला नाही. पोलिस महासंचालकांनी दुसऱ्या शाखेकडून तपास करावा, अशी मागणी खा. इम्तियाज यांनी केली. येत्या १६ सप्टेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान पोलिसांना चकवा देऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कसा घेराव घालतो ते पाहाच, असा इशाराही त्यांनी दिला.

आंदोलनात मुख्य आरोप-जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी अद्याप आरोपी का नाही?-अंबादास मानकापेने १४२ कोटींचे कर्ज उचलले तेव्हा विभाग काय करत होता?-जिल्ह्याभरात पतसंस्थेच्या २८ शाखा विनापरवाना कशा सुरू हाेत्या?-गुन्ह्यातले फिर्यादी असलेल्या अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल उशिरा का सादर केला?-३१ मार्च, २०१९ रोजी एकाच दिवसात चौकशी पूर्ण होऊन त्याच दिवशी ७६ कोटींचे कर्ज कसे उचलले गेले?

राज्यात पतसंस्थेच्या अवस्था-खा. जलील यांनी सहकार खात्यावर गंभीर आरोप केले. सहकार खाते भ्रष्टाचाराने बरबटलेले असल्याचे सांगत राज्यातील त्यांची अवस्था सांगितली.-राज्यात १३ हजार ४१२ नागरी सहकारी पतसंस्था आहेत.-७५ हजार ५२८ पगारदार पतसंस्था स्थापन आहेत.- १ कोटी सभासद.-यात ११० लाख कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.-शेंद्र्याच्या एकाच १ हेक्टर ४० आर जमिनीवर ८ लोकांनी ४५ कोटींचे कर्ज उचलले. ही बाब कोणाच्या निदर्शनास आली कशी नाही?

टॅग्स :fraudधोकेबाजीAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी