‘मड्ड्या’च्या खुनानंतर ‘ते’ हॉटेल सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:04 IST2021-05-24T04:04:41+5:302021-05-24T04:04:41+5:30

शुक्रवारी २१ मे रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास विशाल किशोर फाटे ऊर्फ मड्ड्या (२७, रा. वडगाव-कोल्हाटी) व त्याचे तीन ...

‘They’ hotel seal after ‘Maddya’s’ murder | ‘मड्ड्या’च्या खुनानंतर ‘ते’ हॉटेल सील

‘मड्ड्या’च्या खुनानंतर ‘ते’ हॉटेल सील

शुक्रवारी २१ मे रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास विशाल किशोर फाटे ऊर्फ मड्ड्या (२७, रा. वडगाव-कोल्हाटी) व त्याचे तीन साथीदार मृगनयनी हॉटेलमध्ये दारू पित बसले होते. त्याचवेळी अजय प्रधान व त्याचे साथीदारही तेथे पार्टीसाठी गेले. दोन्ही गँगचे सदस्य समोरासमोर आले आणि जुन्या भांडणावरून वादाची ठिणगी उडाली. अजय प्रधान व त्याच्या साथीदारांनी हॉटेलमध्येच ‘मड्ड्या’सोबत झोंबाझोंबी करीत त्याला रस्त्यावर नेले. बाहेर नेल्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. गुंडांच्या हातातून निसटून तो जीवाच्या आकांताने पळत सुटला तेव्हा अजय प्रधान व अन्य साथीदारांनी डोक्यात दगड मारुन त्याचा खून केला. ही घटना मृगनयनी हॉटेलसमोर घडली होती. संचारबंदी आणि लॉकडाऊनच्या काळातही सुरू असलेले हे हॉटेल अखेर पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर पोलिसांना, प्रशासनाला सील करावे लागले.

महेश हनुमान भोंडवे (रा. बजाजनगर) यांचे महाराणा प्रताप चौकात मृगनयनी बार अ‍ॅण्ड रेस्टारंट नावाचे हॉटेल आहे. ते शिवसेनेच्या एका बड्या नेत्याचे निकटवर्तीय समजले जातात.

Web Title: ‘They’ hotel seal after ‘Maddya’s’ murder