शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएम पक्षाला ‘ते’ विकत घेऊ शकले नाहीत; असदोद्दीन ओवेसी यांचा सर्वच पक्षांवर घणाघात

By मुजीब देवणीकर | Updated: March 21, 2024 12:04 IST

देशात प्रत्येक सहा महिन्याला निवडणुका झाल्या पाहिजेत. जेणेकरून इलेक्ट्रॉल बाँडसारखा पैसा बाहेर येईल.

छत्रपती संभाजीनगर : इलेक्ट्रॉल बाँडच्या मुद्यावर देशातील सर्वच पक्षांनी हजारो कोटी रुपये घेतले आहेत. बोली लावून पक्षांची विक्री झाल्याचे दिसते. ९ हजार कोटी रुपये एकट्या भाजपाला मिळाले. त्याखालोखाल इतर पक्षांना निधी मिळाला. एमआयएम पक्षाला ते विकत घेऊ शकले नाहीत. त्यानंतरही आमच्यावर बी- टीमचा ठपका ठेवला जातो. सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रॉल बाँडला असंवैधानिक ठरविले, ते अतिशय योग्य आहे, येणाऱ्या निवडणुकीत हाच पैसा बाहेर येणार असल्याची टीका बॅरिस्टर असदोद्दीन ओवेसी यांनी केली.

एमआयएमचे मनपातील माजी गटनेता नासेर सिद्दीकी यांच्यातर्फे बुधवारी सायंकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. इफ्तारनंतर माध्यमांशी ओवेसी यांनी संवाद साधला. देशात प्रत्येक सहा महिन्याला निवडणुका झाल्या पाहिजेत. जेणेकरून इलेक्ट्रॉल बाँडसारखा पैसा बाहेर येईल. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतात. अनेक कल्याणकारी योजना घोषित होतात. शेवटी जनतेचे कल्याण असते. ‘वन नेशन वन इलेक्शन’ ही पद्धत संविधानाला अनुसरून अजिबात नाही. केंद्र शासनाने आता सीएए आणले. लवकरच एनआरसीसुद्धा आणतील. या देशातील अल्पसंख्यांक बांधवांना त्रास देणे हा एकमेव हेतू आहे. काही दिवसांनंतर तुम्हाला तुमचे आजाेबा कोण? विचारतील. आधार कार्ड म्हणजे या देशाचे नागरिक आहात असे नाही. आधार कार्डच्या पाठीमागेही असेच लिहिलेले आहे. पत्रकार परिषदेला खा. इम्तियाज जलील, शहराध्यक्ष शारेख नक्षबंदी, नासेर सिद्दीकी यांची उपस्थिती होती.

खाणार नाही, खाऊ देणार नाहीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये मी खाणार नाही, कोणाला खाऊ देणार नाही, अशी घोषणा केली होती. इलेक्ट्रॉल बाँडच्या माध्यमाने पैसे खाल्ले...ढेकरही दिली. सर्वच राजकीय पक्ष या मुद्यावर निर्वस्त्र आहेत, अशा शब्दांत ओवेसी यांनी टीका केली.

किती जागा लढविणार यावर मौन?देशभरात एमआयएम किती जागा लढविणार, या थेट प्रश्नाला ओवेसी यांनी बगल दिली. औरंगाबाद लोकसभा, बिहारमधील किशनगंज आणि हैदराबाद येथील तीन जागांचा पुनरुच्चार केला. देशभरातील किती जागा लढवणार, हे मात्र सांगितले नाही.

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAurangabadऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४